Ravindra Chavan Sarkarnama
कोकण

Sindhudurg Political : ...तर मला आमदार म्हणून लाभार्थी होता आले नसते; प्रमोद जठारांनी सांगितला किस्सा

सरकारनामा ब्यूरो

Sindhudurg News : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत असलेले माजी आमदार प्रमोद जठार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आठवणी संगत एक मोठा किस्सा सांगितला आहे. आप्पासाहेब गोगटे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मतदारसंघातील सलग चारवेळा वेळा आमदार राहिले आहेत, त्यानंतर त्यांचे सुपुत्र अजित गोगटे हे आमदार राहिले आहेत.

आप्पासाहेबांच्या गोगटे फॅमिलीचा खरा लाभार्थी कोण असेल तर तो प्रमोद जठार आहे. कारण या दोघांनंतर मला आमदार होण्याचा मान त्यांनी दिला. अजित गोगटे यांनी नाव सुचवले नसते तर मी लाभार्थी झालो नसतो. त्यांच्यामुळे मला कणकवलीचा आमदार होता आले. त्यामुळे आज आपण लाभार्थी होऊ शकलो. तसा खऱ्या अर्थाने लाभार्थी मी आहे, अशी मोठी आठवण प्रमोद जठार यांनी संगितली.

तसेच गोगटे कुटुंबियांबरोबर असलेले ऋणानुबंध त्यांनी जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उलगडले. महाराष्ट्रातल्या कोकणात होणाऱ्या साकव योजनेला माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांचं नाव देण्यात यावं, अशी मोठी मागणीही त्यांनी उपस्थित असलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुढील पिढीला आप्पासाहेबांची जीवनशैली ही मार्गदर्शक आहे. आप्पासाहेब कसे संवेदनशील होते, कसे कार्यकर्ते होते हे आताच्या पिढीला कळाले पाहिजे. यावेळी आप्पासाहेबांची एक आठवण त्यांनी सांगितली. त्यांच्याकडे एक जीप होती. पूर्वी कार्यकर्ते पैसे जमा करून नेत्यांना गाडी द्यायचे. पण आता काळ 360 अंशामध्ये बदलला आहे. 'शिरा पडलीय आता नेत्यांका कार्यकर्त्यांक गाडी देऊची लागता', अशी मजेदार खास मारवाडी स्टाईल त्यांनी कोटी केली.

आप्पासाहेब गोगटे यांचा पोशाखाचं वर्णन करताना आपण तो सदरा, धोतर आपण कधीही मळकं पाहिलं नाही. असे आप्पा वाटेत दिसलेल्या माणसाला लिफ्ट द्यायचे. आपण अनेक गोष्टी या आप्पासाहेबांकडून शिकलो. अनेक मंडळी आपल्या गाडीत जागा असली तरी सुद्धा वाटेत कोणी भेटल्यावर, जाऊदे पीडा नको असं म्हणतात. पण आप्पा कधीही असं म्हटले नाहीत. वाटेत दिसेल त्याला ते गाडीत घ्यायचे अनेकदा स्वतः ड्रायव्हिंग करायचे.

मी स्वतः आमदार होण्याअगोदर आपण यावरून आप्पांकडे अनेकदा भांडायचो तेव्हा आप्पा मला म्हणायचे आहो कुठले तुम्ही, ते कधीही कोणाला आहो - जाहो शिवाय बोलले नाहीत. आप्पांना मंत्रीपदाची सुद्धा ऑफर होती पण त्यांनी ती विनम्रपणे आकारली. त्यांनी सांगितलं की माझ्या गावाकडचे धुळीचे रस्ते आहेत मी गावाचा विकास करतो. मी गावातच बरा आहे महाराष्ट्रात नको, अशी आप्पासाहेब गोगटे यांची मोठी आठवणही जठार यांनी सांगितली.

जठार यांनी प्रभू श्रीराम यांच्या रामायणातील एक दाखला देत माझ्या गावची धूळ ही लंकेतल्या सोन्यापेक्षाही मला प्रिय आहे, असे सांगणारे आपले आप्पा होते. आप्पासाहेब गोगटे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. हे आपण चांगल्याप्रकारे साजरे करू, यासाठी माझ्या ट्रस्टच्यावतीने आपण कार्यक्रमासाठी एक लाख रुपयांची मदत देत असल्याचीही घोषणा त्यांनी यावेळी केली. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार डॉ. विनय नातू आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT