Congress Sarkarnama
कोकण

Congress Politics : 'ज्याने पाच नगरसेवक घेऊन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यालाच काँग्रेसने फोडला', शिवसेनेसह बंडखोर शाह यांच्याविरोधात उभारले कडवट आव्हान

Congress Vs Shinde Shivsena : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे राजकारण चांगलेच तापले होते. काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दुसरा दिल्याने स्थानिक नेते लियाकत शाह यांनी बंडखोरी केली होती.

Aslam Shanedivan

  1. सुधीर शिंदे यांनी शिंदे सेनेकडून मिळालेल्या वचनभंगामुळे अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला होता, परंतु काँग्रेसने त्यांना पुन्हा नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली.

  2. शिंदे सेनेकडील नेत्यांनी नगराध्यक्षपद आणि नगरसेवकांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले परंतु ते पाळले गेले नाही, असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला.

  3. काँग्रेस जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी या प्रकरणात बंडखोर लियाकत शाह यांच्यावर जोरदार टीका केली.

Ratnagiri News : कोकणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. चिपळूण येथेही जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसत असून नुकताच शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ज्या उमेदवाराने काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तेथेही दगफटका झाल्याने पुन्हा घर वापसी केली आहे.

यानंतर त्यांनी शिवसेनेवर जोरदार पलटवार केला असून शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नसल्याचा आरोप केला आहे. तर याचवेळी बंडखोर लियाकत शाह यांच्यावर टीका करताना, शाह यांची भूमिका पहिल्यापासूनच संशयास्पद असल्याचा दावा केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेली 40 वर्षे फक्त समाजकारणच केले. खोट्या शपथा घेऊन मी कधीही राजकारण केले नाही. पण त्यातही अडचणी आल्यानेच आपण काँग्रेसमधून सोबत पाच नगरसेवक घेऊन बाहेर पडलो.

तसेच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी येथील बड्या नेत्यांनी आपल्याला नगराध्यक्षपदासह सोबतच्या नगरसेवकांना उमेदवारी देण्याचे वचन दिले होते. मात्र, ते त्यांनी पाळले नाही, म्हणून आपण सोबतच्या नगरसेवकांसह अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

पण काँग्रेसने पुन्हा एकदा आपल्यावर विश्वास दाखवला. सुदैवाने काँग्रेसने नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी आपल्यालाच दिली. ही संधीच आता माझ्यासह काँग्रेसच्या विजयाची सुरुवात आणि नशिबाची साथ असल्याची प्रतिक्रिया सुधीर शिंदे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घागही उपस्थित होत्या.

यावेळी घाग यांनी लियाकत शाह यांच्यावर कडवट टीका केली. त्या म्हणाल्या की, शाह यांची भूमिका पहिल्यापासूनच संशयास्पद होती. ते आम्हाला कुठेही विश्वासात घेत नव्हते. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनाप्रमाणे आमच्यापासून लपवून करत होते. केवळ त्यांच्यासाठी मित्रपक्षांबरोबर होणारी आघाडी मला मोडावी लागली.

केवळ शाह यांच्यासाठीच आघाडी मोडावी लागली. मात्र, त्यानंतर शाह यांनीदेखील उमेदवारी अर्ज भरताना अनेक तांत्रिक त्रुटी ठेवत चुका केल्या. यामुळे काँग्रेसचा हात येथून गायब झाला असता. यामुळेच सुधीर शिंदे यांना नगराध्यक्ष पदासाठी एबी फॉर्म दिल्याचे यावेळी घाग यांनी स्पष्ट केले आहे.

FAQs :

1. सुधीर शिंदे पुन्हा काँग्रेसमध्ये का परतले?

शिंदे सेनेकडून दिलेली आश्वासने पाळली गेली नाहीत, म्हणून ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले.

2. त्यांना काँग्रेसने कोणते पद दिले आहे?

काँग्रेसने त्यांना नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.

3. शिंदे यांनी कोणता आरोप शिंदे सेनेवर केला?

नगराध्यक्षपद आणि नगरसेवक उमेदवारीचे दिलेले वचन न पाळल्याचा त्यांनी आरोप केला.

4. जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी कोणावर टीका केली?

त्यांनी बंडखोर नेता लियाकत शाह यांच्यावर कडवट टीका केली.

5. सुधीर शिंदे राजकारणात किती काळ आहेत?

ते गेली ४० वर्षे समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT