Mangesh Kalokhe murder case : रायगड जिल्ह्यातील खोपोली या औद्योगिक शहरात नगरपालिका निवडणुकीनंतर नगरसेविका मानसी यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या झाली. सुपारी देत, राजकीय सुडभावनेतून ही हत्या झाली. मुख्य आरोपी रवींद्र देवकर, मुलगा धनेश देवकर यांच्यासह अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे आणि भरत भगत यांच्यावर या हत्येसंदर्भात संशय आहे.
यातून रायगडमध्ये एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीमध्ये राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या हत्याकांडावरून अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आता खासदार तटकरे यांनी आमदार थोरवेंना न्यायालयाचा झटका देण्याचं पक्कं केलं आहे. त्यानुसार त्यांनी स्थानिक न्यायालयात दावा दाखल केला आहे.
मयत मंगेश काळोखे हे आमदार महेंद्र थोरवे (Shivsena) यांचे कट्टर समर्थक होते. काळोखे यांच्या हत्येवरून, आमदार थोरवे अजित पवार राष्ट्रवादी आणि त्यांच्या पक्षाचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात प्रचंड आक्रमक झाले होते. थेट सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी थोरवेंना आरोप करताना काळजी घ्यावी, असा सूचक इशारा दिला होता. परंतु थोरवे यांनी आरोपाची धार तीव्र केली होती. यानंतर तटकरे यांनी थोरवेंना न्यायालयाचा झटका देण्याचं ठरवलं. त्यानुसार त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
तटकरे यांनी थोरवेंविरोधात माणगावच्या सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. 27 डिसेंबर 2025ला कर्जत इथं मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणावरून आमदार थोरवे यांनी दिलेल्या मुलाखतीत तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
रायगडमध्ये रक्तरंजित राजकरणावर भाष्य करताना, रायगडचा आका सुनील तटकरे, कार्यकर्त्यांना जीवे ठार मारण्यात येत आहे, आदी मुद्यांवर थोरवे यांनी मुलाखतीद्वारे गंभीर आरोप केले. या आरोपांमुळे राजकीय कारकीर्दीला धक्का बसत असल्याने तटकरेंनी 65 कोटींचा दावा दाखल केला आहे.
आमदार महेंद्र थोरवे यांनी, मंगेश काळोखे यांच्या हत्येवरून, खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करताना, तटकरेंच्या सुतारवाडीतील निवासस्थानी रचण्यात आला होता. सुनील तटकरे रायगडमध्ये सत्तेत आल्यापासून रक्तरंजित राजकारण सुरू झालं आहे.
बीडनंतर आता रायगडचे आका सुनील तटकरे आहेत. सुनील तटकरेंच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना मारण्यात येत आहे. आजही सुधाकर घारे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बैठका घेतात. सुनील तटकरे सांगता की सुनील घारेचा या प्रकरणात हात नाही. या प्रकरणाचा त्यांनी तपास केला का? याचा अर्थ हे सगळे पूर्वनियोजित आहे.
सुधाकर घारे फिर्यादीमधला आरोपी आहे. ही घटना घडण्याच्या दोन दिवस आधी रवी देवकर सरकारी वकिलांच्या मार्फत सुतारवाडीत गेला होता. त्याठिकाणी सुनील तटकरेंसोबत बसून, चर्चा करून नियोजितपणे मंगेश काळोखेंची हत्या करण्यात आली, असे गंभीर आरोप केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.