Uddhav Thackeray Deepak Kesarkar narayan rane Sarkarnama
कोकण

Sindhudurg : "केसरकर खुर्ची टिकवण्यासाठी राणेंनी केलेला अपमान विसरतात, पण...", ठाकरे गटातील खासदाराचा हल्लाबोल

सरकारनामा ब्युरो

Vinayak Raut On Deepak Kesarkar :कोकणात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. "रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) निवडणूक लढवू शकतात. ते कुठूनही उभे राहिले, तरी विजयी होतील," असा विश्वास मंत्री दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी व्यक्त केला होत. याच मुद्द्यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार विनायक राऊत ( Vinayak Raut ) यांनी दीपक केसरकरांना लक्ष्य केलं आहे. "केसरकरांना खुर्ची टिकवायची असते म्हणून राणेंकडून कितीही अपमान झाला, तरी ते विसरू शकतात," अशी टीका विनायक राऊतांनी केली आहे.

"केसकरांनी उगाच आमच्या आड येण्याचा प्रयत्न करू नये," असा इशाराही विनायक राऊतांनी दिला आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी ( ४ फेब्रुवारी ) सावंतवाडीत सभा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर विनायक राऊतांनी सभास्थळाची पाहणी केली. त्यावेळी राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

( राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

"केसरकरांनी उद्धव ठाकरेंशी बेईमानी केली अन्..."

"मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढलो, तर आपला निभाव लागणार नाही, हे गृहीत धरून केसकरांनी शिवसेनेत उडी मारली. शिवसेनेनं केसरकरांना निवडून आणत मंत्री केलं. त्याच केसरकरांनी उद्धव ठाकरेंशी बेईमानी केली आणि देवेंद्र फडणवीसांनी चाकरी करत आहेत. आता नारायण राणेंची चाकरी करतील. पुन्हा एकदा दशतवादाला खतपाणी घालण्याचं महान पुण्य केसकरांच्या हातून घडण्याचा योग असेल," असा टोला विनायक राऊतांनी लगावला आहे.

"निलेश राणेंनी केसरकरांची टिंगळटवाळी केली होती"

"नारायण राणेंनी दीपक केसकरांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून हाकलून दिलं होतं. आमच्याकडे चालकाची जागा रिकामी असल्याचं सागून निलेश राणेंनी केसकरांची टिंगळ टवाळी केली होती. केसरकर हे सगळं खुर्ची टिकवण्यासाठी विसरले असतील. पण, सिंधुदुर्गातील जनता विसरणार नाही," असं विनायक राऊतांनी म्हटलं.

"खुर्ची टिकवण्यासाठी केसरकरांची ठाकरेंवर टीका"

"लोकसभेच्या निवडणुकीनंतर दीपक केसकरांची राजकीय घसरण सुरू होणार आहे. त्यामुळे खुर्ची टिकवण्यासाठी केसरकर उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. मात्र, केसकरांनी आमच्या आड येण्याचा प्रयत्न करू नये. उद्धव ठाकरेंनी जे कोकणाला दिलं, ते तुम्हाला आयुष्यभरही देता येणार नाही. ज्या राणेंची दलाली करायला केसरकर निघालेत, त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात होऊ नये, म्हणून दिल्लीत काय आकाडतांडव केला, हे मी पाहिलं आहे. त्यामुळे विकासाच्या गोष्टी केसकरांनी आम्हाला शिकवू नये," असंही विनायक राऊतांनी बजावलं आहे.

Edited By : Akshay Sabale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT