Vinayak Raut : नितेश राणे मराठा समाजाचे मारेकरी; राऊतांनी तोफ डागली

Nitesh Rane : नितेश राणेंनी मनोज जरांगे यांना धमकी दिली होती.
BJP-shivsena Politics
BJP-shivsena Politics Sarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : नितेश राणे हे मराठा समाजाचे मारेकरी आहेत. ज्याप्रमाणे ते जरांगेंवर आरोप करत होते, त्यांना धमक्या देत होते. हे पाहता नितेश राणे मराठा समाज आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत. असा आरोप करत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप आमदार नितेश राणेंवर निशाणा साधला.

दुतोंडी असलेला माणूस म्हणजे नितेश राणे. एकीकडे जरांगे पाटील यांना मराठा समाजाचा तारणहार समजायचे आणि दुसरीकडे त्यांना धमकी द्यायची ही कपटनिती आहे. पण माराठा समाज एक दिवस नितेश राणेंना चांगलाच धडा शिकवेल, असा टोला विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी लगावला आहे. ते सिंधुदुर्ग येथे बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP-shivsena Politics
Assembly Election : तेलंगणातील प्रचारात मराठी पाऊल पडतेय पुढे

राऊत म्हणाले, राज्य सरकारने मराठा समाजाची आणि मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक केली आहे. निवृत्त न्यायाधीश, ज्यांचा मराठा समाजाशी काहीही संबंध नाही, अशा लोकांना पाठवून जरांगेवर प्रश्नांचा भडीमार करायचा, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. यातूनच जरांगे यांनी राज्य सरकारला २ जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे, असे आम्हाला वाटते.

आज मराठा समाजात मोठा असंतोष आहे,अनेकांच्या मनात शंका आहे, की ३१ डिसेंबर ला आमदार अपात्रतेची सुनावणी होणार आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपले राजकीय निवृत्तीचे मरण पुढे ढकलण्यासाठी जरांगे पाटील यांच्यावर दबाव टाकून दोन जानेवारीपर्यंतची मुदत घेतली, आणि जरांगे पाटील यांनीदेखील त्यांना २ जानेवारीपर्यंतची मुदत दिली. पण मराठा समाजाची जी न्याय्य मागणी होती, त्यातून सुटका करून देण्याची संधी त्यांना दिली, असा समाजामध्ये संशय आहे.

दरम्यान, माध्यमांसमोर बोलण्यासाठी मनोज जरांगेंना स्क्रिप्ट कोण लिहून देते? त्यांचा बोलवता धनी कोण आहे, अशी टीका केली होती. इतकेच नव्हे तर, तुम्ही राजकीय भाषा बोलायची बंद करा असा इशाराही दिला होता. यावरून राजकारण चांगलेच तापले होते. त्यानंतर, यापुढे नितेश राणेंनी (Nitesh Rane) आपल्याशी बोलू नये, असे एकच उत्तर जरांगेंनी दिले होते.

Edited By- Anuradha Dhawade

BJP-shivsena Politics
Nagpur ZP : चहा न मिळाल्यानं डॉक्टर संतापले, भूल दिलेल्या चार महिलांना ऑपरेशन थिएटरमध्ये सोडून पळाले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com