Muslim house denial case Sarkarnama
कोकण

Muslim house denial case : मुस्लिम असल्याने घर नाकारलं; धार्मिक भेदभावाचा आरोप, AIMIM शहराध्यक्षांनी ठोकली पोलिसांत तक्रार

AIMIM Kalyan city president Ashfaque Shaikh lodged police complaint after alleged incident caller reportedly refused provide house upon learning applicant Muslim : मुस्लिम असल्याचे सांगताच, घर मिळणार नाही, असे सांगून, फोन कट केल्याच्या प्रकाराची तक्रार AIMIMने केली आहे.

Pradeep Pendhare

Kalyan police complaint : राज्यात जातीवादाला कुठेना कुठे हवा मिळत आहे. यातून वाद उफाळत आहेत. असाच प्रकार ठाणे जिल्ह्यातील कल्याण इथं समोर आला आहे. मुस्लिम लोकांना घर मिळणार नाही, असे एका टेलिकॉलरने सांगितल्याचा आरोप करत कल्याण 'AIMIM'चे शहराध्यक्ष अशफाक शेख यांनी पोलिसांत तक्रार दिली.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कल्याण पोलिस या तक्रारीवर काय कारवाई करतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

'AIMIM'चे अशफाक शेख यांना एका टेलिकॉलरचा फोन आला होता. समोरच्या व्यक्तीने कोनगाव परिसरातील महामार्गालगत असलेल्या एका इमारतीतील फ्लॅट्सबाबत माहिती दिली. संबंधित इमारत स्वस्त दरात उपलब्ध असल्याचे सांगत त्याने घरांच्या किंमती, सुविधा आणि इतर तपशीलांची माहिती दिली.

या वेळी अशफाक शेख यांनी आपल्या आर्थिक क्षमतेबाबत माहिती दिल्यानंतर काही प्रश्न विचारले. सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर त्यांनी शेवटी, या ठिकाणी मुस्लिम (Muslim) लोकांना घर मिळेल का? असा प्रश्न विचारला. त्यावर समोरच्या व्यक्तीने मुस्लिम लोकांना घर मिळणार नाही, असे स्पष्ट सांगितल्याचा आरोप शेख यांनी केला आहे.

हे उत्तर ऐकताच संतप्त झालेल्या अशफाक शेख यांनी, मुस्लिमांना घर मिळत नसेल, तर तुम्ही मला फोन कसा केला? माझे नाव आणि नंबर तुमच्याकडे होते ना? असा सवाल संबंधित व्यक्तीला केला. त्यानंतर त्या व्यक्तीने दिलगिरी व्यक्त करत फोन कट केल्याचे सांगण्यात आले.

या घटनेनंतर अशफाक शेख यांनी तातडीने बाजारपेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. संबंधित फोन करणारी व्यक्ती कोण आहे, तो ज्या विकासक कंपनीचे नाव घेत होता, ती कंपनी कोणती आहे, तसेच संबंधित इमारत नेमकी कुठे आहे याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुस्लिम लोकांना घर मिळणार नाही, असे सांगणारे नेमके कोण आहेत? असा संतप्त सवालही अशफाक शेख यांनी उपस्थित केला आहे. आता या प्रकरणात पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT