

Hindu girl exploitation case : बीडमधील राजू सिंकदर शेख याने समाज माध्यमावर हिंदू 'अजय म्हस्के' नावानं खातं सुरू केलं. समाज माध्यमांवरील याच खात्याद्वारे पालघरमधील हिंदू युवतीशी मैत्री, पुढे प्रेमसंबंध अन् लग्नाचं आमिष दाखवत, तिचं शारीरिक अन् आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हिंदू संघटनांनी हा प्रकाराला 'लव जिहाद' असल्याचा आरोप करत, आरोपीविरोधात कठोरातली कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पालघर पोलिसांनी राजू सिंकदर शेख ऊर्फ अजय म्हस्के, याला अटक केली असून, त्याला न्यायालयाने चार दिवस पोलिस (Police) कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, पीडितेचं आर्थिक शोषण करण्यात राजू शेख याची पत्नीचा देखील सहभाग असल्याचं समोर आलं आहे.
पीडित युवतीचे पतीबरोबर सतत वाद होत असल्याने ती तिच्या मुलाला घेऊन वडिलांबरोबर राहाते. पीडित युवतीचे देखील समाज माध्यमांवर (Social Media) खाते आहे. याच माध्यमावर अजय म्हस्के नावाच्या खात्यावरून पीडित युवतीला मैत्रीची रिक्वेस्ट आली अन् तिने ती एक्सेप्ट केली.
यानंतर पीडिता आणि राजू सिंकदर शेख ऊर्फ अजय म्हस्के याच्याशी समाज माध्यमावर मैत्री झाली. पुढे राजू शेख याने तिला तिच्या मोबाईल क्रमांक दिला. मोबाईल वारंवार बोलणं झाल्यानंतर प्रत्यक्ष भेटले. भेटीनंतर राजू सिंकदर शेख ऊर्फ अजय म्हस्के याने लग्नाचा प्रस्ताव ठेवला.
लग्न करत असल्याने पीडितेला मैत्रीची खात्री पटली. पुढे हाॅटेल, लाॅज भेटीत, शारीरिक संबंध ठेवले. लग्न करायचे म्हटल्यावर आधारकार्ड पाहिल्यावर, त्यावर राजू सिंकदर शेख हे नाव पीडितेला आढळलं. यानंतर अजय म्हस्केचं मूळ नाव हे राजू सिंकदर शेख आहे हे पीडितेला कळालं.
सिंकदर शेख हा बीड जिल्ह्यातील वाडवनी तालुक्यातील बहेगावचा रहिवाशी असल्याचं त्या आधारकार्डच्या पत्त्यावरून कळालं. राजू सिंकदर शेख याने जून 2026मध्ये लग्न करू, असे पीडितेला सांगितले. बीडमध्ये पीडितेने राजू सिंकदर शेख याची भेट घेतली. तेथून पुढे तो अहिल्यानगर इथं गेला.
यानंतर राजू सिंकदर शेख याने पीडितेची दोनदा हाॅटेलवर भेट घेतली. त्याने पुन्हा पीडितेला लग्नाचं अमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले. पण पुढे पीडितेने राजू सिंकदर शेख याची अधिक चौकशी केल्यावर त्याचे लग्न झालेले असून, त्याला दोन मुलं देखील आहेत. यामुळे तिला धक्का बसला आहे.
पीडितेने याचा जाब विचारल्यावर, राजू सिंकदर शेख याने तिच्या बीडमधील पत्नीला समोर केलं. तिने तिचे पीडिताचे अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच दोन लाख रूपयांची मागणी केली. यापूर्वी देखील पीडितेकडून अडीच लाख रूपये उकळले. यानंतर पीडितेने पुढे पोलिसांकडे जात झालेल्या अन्यायाची कैफियत मांडत तक्रार केली.
पालघर पोलिसांनी सापळा रचून राजू सिंकदर शेख याला पुण्यातून अटक केली. न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात फसवणूक, ब्लॅकमेल आणि खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, बजरंग दलाचे पालघरमधील पदाधिकारी मुकेश दुबे आक्रमक झाले असून, याप्रकरणात कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.