Pratap Sarnaik BJP Ultimatum Sarkarnama
कोकण

Pratap Sarnaik BJP Ultimatum : कार्यकर्ते परत द्या, भाजप बसली रूसून; शिंदेंचा शिलेदार भडकला, म्हणाला, 'आता बस झालं...'

Pratap Sarnaik Issues Ultimatum to BJP on Mira Bhayandar Alliance : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत युतीसाठी भाजपला एकनाथ शिंदे शिवसेनेकडून अल्टिमेटम देण्यात आला आहे.

Pradeep Pendhare

Mira Bhayandar Municipal Corporation : पुढील काही तासांत राज्यातील महायुतीचे बहुतांशी चित्र स्पष्ट होईल. कुठं भाजप, तर कुठं एकनाथ शिंदे शिवसेना, तर कुठं अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अडून बसली आहे. युतीसाठी प्रमुख नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. विशेष करून, महायुतीच्या अंतिम फैसल्यासाठी नेत्यांमध्ये आज रात्रीच्या बैठका होणार आहेत.

यानंतर पुढील 24 तासांत राज्यातील बहुतांशी ठिकाणचे महायुतीचे चित्र स्पष्ट होईल. पण ठाणे जिल्ह्यातील मीर-भाईंदर महापालिकेतील महायुतीच्या निर्णयासाठी दिरंगाई करत असलेल्या भाजपवर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक चांगलेच संतापले असून, पुढील 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी भाजप अन् एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनामधील युतीचा तिढा अधिकच वाढला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला थेट 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. ठरलेल्या वेळेत युतीबाबत स्पष्ट निर्णय न झाल्यास आम्ही आमचा स्वतंत्र निर्णय घेऊ, असा इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला.

भाजप (BJP) आमदार नरेंद्र मेहता यांनी युतीसाठी काही अटी मांडल्या होत्या. त्यामध्ये ‘शिवार गार्डन’ एकनाथ शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्याला चालवण्यासाठी दिले आहेत, ते परत महापालिकेला देणे आणि भाजपचे जे कार्यकर्ते एकनाथ शिंदे शिवसेनेत घेतले गेले आहेत, ते परत करणे या प्रमुख अटींचा समावेश होता. यातून भाजप-एकनाथ शिंदे शिवसेनेमधील युतीत तणाव वाढला आहे.

'शिवार गार्डन, परत महापालिकेला परत द्या. तसंच भाजपचे कार्यकर्ते जे पक्ष प्रवेश करून घेतले आहेत, ते परत करण्याची मागणी केल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. यावर पक्षीय पातळीवर निर्णय घेऊ. पण महायुतीसंदर्भात पहिली बैठक घेणं गरजेचे आहे. यानुसार भाजपच्या कार्यालयात पहिली बैठक झाली.

मोठा भाऊ व्हा, पण...

या बैठकीत नरेंद्र मेहता होते. त्यावेळी युतीची प्रामाणिक इच्छा आहे का? असा प्रश्न मंत्री सरनाईक यांनी केला. तसंच ठाण्याला आम्ही मोठे भाऊ आहोत, तर मीरा-भाईंदरमध्ये तुम्ही म्हणजे, भाजप मोठा भाऊ आहे. ठाण्याला शिवसेनेच्या 82, तर भाजपच्या 24 जागा आहेत. मीरा-भाईंदरमध्ये 95 जागांपैकी भाजपच्या 61, तर शिवसेनेच्या 22 जागांवर निवडून आल्या आहेत, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

भाजप शिंदेसेनेला 13 जागा देणार

ठाण्याला जी युतीची बोलणी होईल, तीच मीरा-भाईंदरला होईल. जागांवरून वाद घालण्यासाठी वेळ नाही. ठाण्यातील अडचणीच्या चार जागा भाजपल्या दिल्या आहेत. यावर मीरा-भाईंदरमधील अहवाल भाजपचे महेता यांनी मंत्री सरनाईक यांना दाखवत, तुमचे 22 नगरसेवक देखील भाजपच्या पाठिंब्याशिवाय निवडून येणार नाहीत. त्यामुळे आम्ही 13 जागा देतो, असा प्रस्ताव ठेवल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

मंत्री नाईक यांचा भाजपला अल्टिमेटम

अर्ज भरण्यासाठी दोन दिवस राहिले आहेत. या प्रस्तावाची माहिती महायुतीमधील घटक पक्ष म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी दखल घेत, निर्णय खाली देतो असे सांगितले. परंतु भाजपने युतीचा निर्णय़ पुढील 24 तासांत देणे अपेक्षित आहे. उद्या दुपारपर्यंत निर्णय दिला, तर ठीक आहे नाहीतर आम्ही निर्णायक भूमिका घेऊ, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT