Sindhudurg Politics : माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने दिलेल्या तक्रारीनंतर अघोरी कृत्यांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन राजकीय पदाधिकाऱ्यांना ठाणे पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
पोलिस घेतलेल्या या भूमिकेमुळे कोकणातील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.
कोलगाव येथील फिरोज शेख ऊर्फ फिरोज बाबा व त्याला साथ देणारा मुख्य साथीदार राम यल्लाप्पा वडार याला ठाणे (Thane) पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या पोलिस कोठडीत आज 18 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंध जोडला गेल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन राजकीय पदाधिकाऱ्यांना ठाणे पोलिसांनी नोटीस बजावली आहे. हे तीन राजकीय नेते कोण? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
यातच शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी, एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख संजू परब यांना नोटीस आल्याचा दावा केला आहे. यावर संजू परब यांनी पलटवार केला आहे. रात्री नऊ वाजेपर्यंत मला कोणतीही नोटीस मिळाली नाही. मग माझ्यापेक्षा आधी ती वैभव नाईकांकडे कशी पोहोचली? ते दारू पिऊन बोलत आहेत का? असा घणाघात संजू परब यांनी केला.
फिरोज बाबांशी माझा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत, नोटीस हातात आल्यावरच उत्तर देईन, असेही ते म्हणाले. या प्रकरणाशी निगडीत असल्याच्या संशयावरून सिंधुदुर्गातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा नवा फड सुरू झाला आहे.
दरम्यान, माजी खासदार राऊत यांच्या सुनेने केलेल्या जादूटोणा आणि कथित अघोरी प्रथांच्या आरोपांनंतर या प्रकरणाचा तपास कमालीचा वेगवान झाला आहे. ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने या गुन्ह्यातील मुख्य संशयित फिरोज बाबा याच्या तालुक्यातील कोलगाव येथील घराची झडती घेतली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असताना जिल्ह्यातील अन्य तीन राजकीय नेत्यांनाही साक्षीदार म्हणून ठाणे पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या तिन्ही व्यक्ती वेगवेगळ्या पक्षाच्या बड्या नेत्या आहेत; त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये यामुळे खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.