Pramod Jathar, Ravindra Chavhan, Kiran Samant. Sarkarnama
कोकण

Ratnagiri Political News : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नवा 'ट्विस्ट'

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri Political News : महायुतीकडून कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण ऊर्फ भय्या सामंत आणि प्रमोद जठार ही नावे चर्चेत असतानाच आता सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव या लोकसभा मतदारसंघासाठी समोर आले आहे.

रवींद्र चव्हाण यांच्या नावामुळे नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. अशातच भय्या सामंत यांनी 'मी किरण रवींद्र सामंत... रोकेगा कौन ?' अशी व्हाॅट्सअप स्टेटसलाईन ठेवल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या, पण आता रवींद्र चव्हाण हे आपले मोठे बंधू आहेत. त्यांना उमेदवारी मिळाल्यास आपण काम करू, असे माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे. त्यामुळे किरण सामंत यांनी माघार घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

'सार्वजनिक बांधकाममंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavhan) त्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली तर मी त्यांचा प्रचार करेन. चव्हाण हे महायुतीमधील एक घटक आहेत. वरिष्ठ पातळीवरून जो उमेदवार देतील तो आम्हाला मान्य असेल,' अशी पुस्तीही किरण सामंत यांनी जोडली आहे.

माझे व्हाॅट्सअप स्टेटस हे फुकट प्रसिद्धी मिळावी यासाठी होते, असे सांगतानाच पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण नक्कीच निवडणूक लढू, हे सांगायला किरण सामंत विसरले नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजितदादा पवार आणि वरिष्ठ पातळीवरील सर्व मंडळी जो देतील तो उमेदवार मला मान्य असल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गात नारायण राणे यांची ताकद आहे. त्यामुळे रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.

महायुतीचा उमेदवार ठरवताना केंद्रीयमंत्री नारायण राणे, मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, आमदार शेखर निकम या सगळ्यांचा विचार घेऊनच महायुतीचा उमेदवार अंतिम केला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे आता या सगळ्या विषयावर शिवसेना, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणती प्रतिक्रिया येते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT