kokan politics; uday samant bhaskar jadhav sarkarnama
कोकण

kokan politics : राजकीय रणधुमाळीत भावनिक ट्विस्ट! जाधवांनी सामंतांना दिला अनपेक्षित सल्ला; ‘हेलिकॉप्टरने फिरतोस…’

uday samant bhaskar jadhav politics : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे अर्बन बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात राजकारणातील कट्ट्र विरोधक एकत्र आले होते. यावेळी कट्टर विरोधकाने पालकमंत्र्यांना दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Aslam Shanedivan

  • उदय सामंत आणि भास्कर जाधव यांच्यातील भावनिक प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधले.

  • राजकीय मतभेद असूनही दोन्ही नेत्यांनी माणुसकी आणि आदर दाखवला.

  • या घटनेमुळे कोकणातील राजकारणात सकारात्मक संदेश गेला.

Chiplun News : राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि शिवसेना (उबाठा) गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यातील एका भावनिक प्रसंगाने श्रोत्यांनी वाहवा मिळवली. निमित्त होते चिपळूण अर्बन बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याचे. या कार्यक्रमात राजकीय मतभेद विसरून या दोन्ही नेत्यांमधील कोकणी नमुना आणि दिलदारपणा पाहायला मिळाला.

पुढील कार्यक्रमासाठी तातडीने निघायचे असल्याची बाब पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या कानावर घातली. त्यावर जाधव यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती.

दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताची आठवण करून देत जाधव म्हणाले, ‘‘तू कायम विमानाने आणि हेलिकॉप्टरने फिरतोस. स्वतःची काळजी घे, विमान कंपनीची नीट चौकशी कर. तुझ्यासारख्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे.’’

एका राजकीय विरोधकाच्या तोंडून आलेले हे काळजीपोटीचे शब्द ऐकून मंत्री सामंतही भावूक झाले. आपल्या भाषणात या प्रसंगाचा उल्लेख करताना मंत्री सामंत म्हणाले, ‘‘कोकणातील लोकप्रतिनिधींच्या मनात किती माणुसकी असते, हे आज भास्कर जाधव यांनी दाखवून दिले. राजकारणात आमचे संघर्ष कितीही असले, तरी आपल्या जिल्ह्यात असा दिलदार विरोधक आहे, याचे मला मोठे समाधान आहे.’’

मतभेद बाजूला ठेवून सर्व एकवटले

या सोहळ्याच्या नियोजनावेळी दोन्ही नेते एकत्र येतील का, अशी साशंकता आयोजकांमध्ये होती; मात्र, मंत्री सामंत यांनी स्वतः पुढाकार घेऊन आमदार भास्कर जाधव आणि आमदार शेखर निकम या सोहळ्याला हवेच, अशी भूमिका घेतली होती. राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी आणि माणुसकीसाठी आम्ही सर्व एकत्र आहोत, असाच संदेश या निमित्ताने त्यांनी दिला.

FAQs :

1. हा प्रसंग कुठे घडला?
चिपळूण अर्बन बँकेच्या उद्घाटन सोहळ्यात हा प्रसंग घडला.

2. कोणते नेते या घटनेत सहभागी होते?
उदय सामंत आणि भास्कर जाधव.

3. जाधवांनी काय सांगितले?
सामंत यांनी प्रवासात काळजी घ्यावी असा सल्ला दिला.

4. सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी जाधवांच्या माणुसकीचे कौतुक केले.

5. या घटनेचा संदेश काय आहे?
राजकारणापलीकडेही माणुसकी आणि आदर महत्वाचा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT