• पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा राजकारणात हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.
• भाजपच्या जि.प. गटनेतेपदी प्रमोद अधटराव यांची निवड करण्यात आली आहे.
• उबाठा शिवसेनेच्या गटनेतेपदी माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
ratnagiri politica News : रत्नागिरी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक १६ मार्च रोजी होणार आहेत. पण त्याआधी ९ मार्च रोजी पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक होणार आहे. दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेनंतर भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांसमोर ओळख परेड करून गटनेत्यांची निवड करण्यात आली. भाजपच्या जि.प. गटनेतेपदी प्रमोद अधटराव तर शिवसेनेच्या (उबाठा) गटनेतेपदी माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील पक्षीय बलानुसार गटनेत्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात जि.प. व पं.स.मध्ये सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदेंकडून गटनेत्यांची निवड नुकतीच करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांसमोर गटाची स्थापना करण्यात आली होती. यानंतर आता भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटांची स्थापना करण्यात आली. जिल्हा परिषदेत भाजपचे चार सदस्य निवडून आले असून गटनेतेपदी संगमेश्वरचे तालुकाध्यक्ष व कोसुंब गटातून विजयी झालेले प्रमोद अधटराव यांची निवड करण्यात आली आहे.
‘उबाठा’च्या गटनेते विक्रांत जाधव
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने जिल्हा परिषद गटनेते पदी आमदार भास्कर जाधव यांचे सुपूत्र विक्रांत जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच चिपळूण आणि खेड तालुक्यांतील अनुभवी कार्यकर्त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. ठाकरे शिवसेनेने विक्रांत जाधव यांच्या माध्यमातून पक्षाची बाजू भक्कमपणे मांडणारा आक्रमक चेहरा दिला आहे. त्यांच्या निवडीचे पत्र आज जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. पंचायत समिती स्तरावरही ठाकरे शिवसेनेने नवीन नियुक्त्या केल्या आहेत. चिपळूण पंचायत समितीच्या गटनेतेपदी गौरव पाटेकर, खेड पंचायत समितीत अजय चाळके यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान बुधवारी भाजपच्या चिपळूण पं.स. गटनेतेपदी विनोद भुरण, रत्नागिरी पं.स.च्या गटनेतेपदी संयोग तथा दादा दळी, गुहागर पं.स.च्या गटनेतेपदी निलेश सुर्वे, संगमेश्वर पं.स.च्या गटनेतेपदी महेश जड्यार यांची निवड करण्यात आली आहे. चिपळूण पं.स.च्या गटनेतेपदी गौरव पाटेकर यांची निवड करण्यात आले आहे. खेड पं.स.च्या गटनेतेपदी अजय चाळके यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रशांत यादव यांनी नूतन जिल्हा कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या निवडीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर, आज रत्नागिरी त्यांनी ही १०० लोकांची जंबो कार्यकारिणी जाहीर केली. या नवीन कार्यकारिणीमध्ये अनुभवी आणि तरुण चेहऱ्यांचा समतोल साधण्यात आला आहे.
या नवीन कार्यकारिणीमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून स्वतः प्रशांत यादव (चिपळूण) धुरा सांभाळणार आहेत. त्यांच्या सोबतीने उपाध्यक्ष म्हणून प्रमोद अधटराव (आंबव, संगमेश्वर), संदीप सुर्वे (नाचणे, रत्नागिरी), संगीता जाधव (साडवली, संगमेश्वर), बळीराम मोरे (कापरे, चिपळूण), स्नेहा मेस्त्री (खेर्डी , चिपळूण), चंद्रकांत मांडवकर (देवरुख, संगमेश्वर), भास्कर सुतार (पाचळ, राजापूर), विकास सावंत (रत्नागिरी), सुहास आटलेकर (रत्नागिरी) आणि शितल पटेल (राजापूर) यांची नियुक्ती केली आहे.
संघटनात्मक कामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सरचिटणीस पदाची जबाबदारी ओंकार फडके (नाचणे, रत्नागिरी), स्वानंद रानडे (चिपळूण), अभिजित गुरव (कोदवली, राजापूर) आणि सुप्रिया उतेकर (खेर्डी, चिपळूण) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. चिटणीस म्हणून राजन पटवर्धन (नाचणे, रत्नागिरी), निलेश भुरवणे (देवरुख, संगमेश्वर), योगेश शिर्के (चिवेली, चिपळूण), मनोज पाटणकर (रत्नागिरी), नयना पवार (सती, चिपळूण), अनिल सावर्डेकर (चिपळूण), समीर टाकळे (चिपळूण), समिरा सुर्वे (लांजा दक्षिण), अपेक्षा दाभोळकर (लांजा उत्तर) आणि अभिनव भुरण (खेड्डी, चिपळूण) यांची निवड झाली आहे. तसेच, जिल्ह्याच्या कोषाध्यक्षपदी मकरंद उर्फ आशिष खातू (चिपळूण) यांची नियुक्ती केली आहे.
FAQs :
1. जि.प. गटनेतेपदी भाजपकडून कोणाची निवड झाली?
भाजपकडून प्रमोद अधटराव यांची जिल्हा परिषद गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे.
2. उबाठा शिवसेनेच्या गटनेतेपदी कोणाची निवड झाली?
उबाठा शिवसेनेच्या गटनेतेपदी माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांची निवड झाली आहे.
3. ही निवड का करण्यात आली?
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटनेते निश्चित करण्यात आले.
4. गटनेत्यांची निवड कुठे झाली?
जिल्हाधिकाऱ्यांसमोर ओळख परेड करून गटनेत्यांची निवड करण्यात आली.
5. या निवडीचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
या निवडीमुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.