

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाची घोषणा कसबा संगमेश्वर येथे करण्यात आली होती, मात्र कामात प्रगती झालेली नाही.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी चिपळूण येथे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर विलंबाबाबत टीका केली.
कसबा संगमेश्वर येथील ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे स्मारक प्रकरण राजकीय वादाचा विषय बनले आहे.
chiplun News :मुख्यमंत्र्यांनी कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली. येथील पालकमंत्र्यानी त्यांचीच री ओढली. मात्र त्यानंतर या कामात काहीच प्रगती झालेली नाही. मुख्यमंत्र्यांना अशी कोणती भिती वाटते की ते स्मारक उभ करत नाहीत. इथल्या इतिहासातून बऱ्याचशा गोष्टी पुढे येऊ शकतात. मुख्यमंत्र्याच्या मनात जो काही विचार आहे, त्या विचारास या गोष्टींची अडचण होऊ शकते, या भितीपोटी स्मारकास विलंब होत नाही ना, अशी शंका येत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी चिपळूण येथे पत्रकार परिषदत केली.
चिपळुणातील धवल प्लाझा येथे काँग्रेसचे कोकण विभागीय प्रशिक्षण शिबिर तीन दिवस सुरू होते. रविवारी त्याचा समारोप झाला. याप्रसंगी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. प्रदेशाध्यक्ष सकपाळ म्हणाले, कार्यकर्त्यांना नवी उर्जा मिळण्यासाठी हे प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये नेतृत्व संगम, शक्ती संगम, स्वराज्य संगम, युवा संगम, अहिंसा के रास्ते आदींची माहिती देण्यात आली. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या या नेतृत्वांना थेट पक्ष संघटनेत संधी दिली जाणार आहे. या उपक्रमाचा कोकणातून प्रारंभ झाला.
तीन दिवसीय प्रशिक्षण कालावधीत महात्मा गांधीच्या स्मारकासह कसबा संगमेश्वर येथील ऐतिहासिक स्थळाला देखील भेट दिली. छत्रपती संभाजी महाराजांचे राहिलले कार्य पूर्ण झाले पाहिजे, अशा सर्व भारतीयांची भावना आहे. मात्र आता स्वराज्यच धोक्यात आले आहे. येथे संभाजी महाराजाचे स्मारक अद्यापही उभे राहू शकले नाही. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याची घोषणा केली. मात्र मुख्यमंत्र्यांना भिती वाटत असल्याने या स्मारकास विलंब होत आहे.
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात लढा
लोटे येथे घातक रसायनांचे उत्पादन करणाऱ्या लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात नागिरकांनी लढा दिला. यात कॉग्रेस देखील सहभागी झालेली आहे. येत्या काही दिवसात विधानसभा आणि विधानपरिषदेत दोन्ही सभागृहात कॉंग्रेसचे आमदार आवाज उठवतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी व्यक्त केला.
1. स्मारकाची घोषणा कोठे करण्यात आली होती?
कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली होती.
2. वाद का निर्माण झाला आहे?
घोषणेनंतर कामात प्रगती न झाल्यामुळे विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
3. टीका कोणी केली?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी पत्रकार परिषदेत टीका केली.
4. पत्रकार परिषद कोठे झाली?
चिपळूण येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.
5. पुढे काय होऊ शकते?
सरकारकडून अधिकृत भूमिका स्पष्ट झाल्यानंतर स्मारक प्रकल्पाच्या पुढील टप्प्याबाबत निर्णय होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.