Uddhav Thackeray News Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray News : 'धनुष्यबाण चोरला अन् गद्दारांनी कोकणातून गायब केला'; ठाकरेंनी ठेवले शिंदेंच्या दुखण्यावर बोट!

Lok Sabha Election 2024 : कोकण म्हणजे शिवसेना असं समीकरण असलेल्या कोकणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पिछेहाट..

Chetan Zadpe

Ratnagiri News : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कोकणातील रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्यासाठी ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा तोफ डागली. 'एकनाथ शिंदे यांनी चोरलेल्या धनुष्यबाणाची भाजपने वाताहत केली,' असे उद्धव ठाकरे म्हणाले. (Lok Sabha Election 2024)

भाषणाच्या सुरुवातीला ठाकरे म्हणाले, "कोकण हे शिवसेनेचं हृदय आहे. मला अभिमान आहे की शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला तरी कोकण माझ्यसोबत आहे. एक तर त्यांनी शिवसेना फोडली. शिवसेना चोरली. चोरलेला धनुष्यबाण गद्दारांकडे दिलं. गद्दारांच्या जागा कापल्या. उमेदवार बदलले. धनुष्यबाण तर गद्दारांनी चोरलाच. आता कोकणातून गायब करुन टाकला. गद्दारांना कळलंच नाही, त्यांचे दिल्लीत बसलले दोन मालक कोकण आणि शिवसेनेचं नातं तोडायला निघालेत,' अशा शब्दात ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदींवर नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी 56 इंचाची छाती असल्याचे सांगत होते. एक अकेला सब पे भारी असे ते विरोधकांना उद्देशून म्हणत होते. यापूर्वी त्यांचा काय रुबाब होता. आता मात्र त्यांच्या छातीतून हवा गेली आहे. मोदींचा आत्मविश्वास पहिल्यासारखा दिसत नाही. 2014 मध्ये फसलो होतो. त्यावेळी संपूर्ण शिवसेना त्यांच्यासोबत असल्याने त्याचा विश्वास मोठा होता. आता मात्र तसे राहिले नाही. 'एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला सर्व भ्रष्टाचारी,' अशी पंतप्रधान मोदींची (Narendra Modi) खिल्ली ठाकरेंनी उडवली.

"सध्या कोणता नेता कुणीकडे आहे, हे समजत नसल्याचेही सांगत ठाकरेंनी राज्यात आपीएल म्हणजेच इंडियन पॉलिटिकल लिग सुरू असल्याचे म्हटले. काल एका पक्षात असलेला नेता आज दुसऱ्या पक्षात असल्याने लोक संभ्रामात आहेत. भाजपने राज्यातील राजकारणाचा स्तर खालावला आहे. अखंड शिवसेना फोडून शिंदेंच्या हातात धनुष्यबाण दिला. आता त्यांचे उमेदवार दिल्लीतून कापले जात आहेत. यंदा कोकणातून धनुष्यबाण गायब करण्याचा डाव टाकला. दिल्लीतील हा डाव मुख्यमंत्री शिंदेंच्या लक्षातच येत नाही," असेही ठाकरेंनी (Uddhav Thakceray) केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT