Sharad Pawar News : मोदी पुण्यात काय बोलणार हे शरद पवारांनी आधीच सांगितलं, म्हणाले...

Modi's campaign rally in Pune : मोदींची सोमवारी पुण्यात बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे.
Sharad Pawar, Narendra Modi
Sharad Pawar, Narendra ModiSarkarnama

Loksabha Election Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (सोमवार) बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी पुण्यात प्रचार सभा घेणार आहेत. या सभेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीसाठी उत्तम वातावरण निर्मिती करण्याचं प्रयत्न करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आल्यानंतर ते शरद पवार यांच्यावर टीका करणार हे निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषणात नेमकं काय बोलणार याबाबतचा अंदाज बांधला आहे.

बारामती लोकसभा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार(Sharad Pawar) आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये सासवड येथे जाहीर सभा घेण्यात आली. या जाहीर सभेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले, निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. निवडणुकीतून देश कशा पद्धतीने चालणार हे ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने हा देश चालवत आहेत ते पाहिल्यानंतर चिंता वाटते. देशातील नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहमतीने देशाचा कारभार चालवणं हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र सध्याचे चित्र वेगळे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar, Narendra Modi
Supriya Sule News: मोदींचे आम्ही तुतारी वाजवून आदराने स्वागत करू; सुळेंची खोचक प्रतिक्रिया

स्थानिक पातळीवर लोकशाही दिसत नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका यांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. अशीच परिस्थिती राहिली तर राजकर्त्यांना पुढे जाऊन विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका देखील न घेण्याची दुर्बुद्धी सुचू शकते आणि ते चित्र सध्या देशामध्ये दिसत असल्याची टीका शरद पवार यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) हे सध्या चारसो के पार हा नारा देत आहे. त्यांना एवढा मोठा प्रमाणात खासदारांची संख्या हवी आहे. कारण त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधान बदलायचा आहे. याबाबतच्या टीका झाल्यानंतर ते संविधान बदलणार नाही असं सांगतात मात्र कर्नाटक राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथील भाजपचे खासदार आम्हाला देशाची घटना बदलायची आहे.त्यासाठी 400 खासदारांचा आकडा हवा आहे. अशी वक्तव्य करत आहेत. यातून लोकशाही किती धोक्यात आहे. याची प्रतीची या भाषणातून येत असून त्यामुळे या निवडणुकांमध्ये काळजीपूर्वक निर्णय घेण्याची गरज असल्याचे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar, Narendra Modi
Sanjay Raut Vs Ajit Pawar: ...तर बारामतीत अजित पवार राजदूतवर दूध विकत असते!

पंतप्रधान मोदी सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी जात आहेत. ते महाराष्ट्रात आल्यानंतर ते आमची आठवण काढतात आमच्यावर टीका टिप्पणी करतात उद्या पुण्यामध्ये त्यांची सभा आहे. तुम्ही त्यांचं भाषण ऐका पुण्यात आल्यानंतर ते भाषणाची सुरुवात पुणेकरांना माझा नमस्कार असं म्हणून करतील. त्यानंतर ते मराठी मध्ये एक- दोन वाक्य म्हणतील आणि त्यानंतर त्यांना शरद पवारांची आठवण येईल अशी खोचक टीका शरद पवारांनी नरेंद्र मोदी यंच्यावर केली.

तसेच शरद पवार पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्या ज्यांच्या वरती भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सध्या त्यांच्याच पक्षांमध्ये आहेत. आरोप करायचे आणि नंतर त्या लोकांना आपल्या पक्षात घ्यायचं असं कुठेतरी भाजपने चालवले असल्याचं शरद पवार यांनी सांगितले.

(Edted by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com