Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray : राऊतांची उमेदवारी निश्चित, ठाकरेंच्या दौऱ्यात प्रचाराचा शुभारंभ?

सरकारनामा ब्यूरो

Sindhudurga Political News :

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी लोकसभेसाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघासाठी निश्चित मानली जाते. त्यांच्या प्रचाराचा नारळ उद्धव ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात फुटला जाईल, अशी शक्यता आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या दौऱ्यात या लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेणार आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 आणि 5 फेब्रुवारीला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौऱा करणार आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. त्याचप्रमाणे बारसू रिफायनरी विरोधी स्थानिकांची भेट देणार आहेत.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा हा दौरा आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर होणार असल्याने त्याला विशेष महत्त्व आले आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात (Ratnagiri Sindhudurga Loksabha Constituency) पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेताना ते देवदर्शनही करणार आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्या दौऱ्याची सुरुवात बांद्यापासून करणार आहेत.

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी (4 फेब्रुवारी) सावंतवाडी, कुडाळ, मालवण, आंगणेवाडी भराडीदेवी दर्शन, कणकवली असा दौरा आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे हे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 5 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे बारसू, राजापूर, रत्नागिरी, देवरुख, चिपळूण या ठिकाणांचा दौरा करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे यांनी शिवसनेनेच्या अधिवेशनात महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. सिंधुदुर्ग ही सुरुवात आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधणार आहेत.

कोकणातील लोकसभेची जागा ठाकरे गटाकडे आहे आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यामुळे या दौऱ्यात उद्धव ठाकरे विनायक राऊतांच्या प्रचाराचा नारळ फोडतील, असे सांगितले जाते.

दरम्यान, या दौऱ्यात उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन सिंहासनाचे पूजन करणार आहेत. हे सिंहासन आमदार वैभव नाईक यांच्या फंडातून झालेल्या निर्माण करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे मनमोकळेपणाने जिल्ह्यात फिरणार असून जाहीर सभा देखील घेतली, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT