Bhaskar Jadav sarkarnama
कोकण

Bhaskar Jadav :'नकली माल असेल तर जास्त प्रसिद्धी...', भास्कर जाधवांचा शिंदे गटाला टोला

Bhaskar Jadav Criticized shinde Group Shivsena : उद्धव ठाकरे यांनी एकच नारा दिला होता 'भाजप तडीपार' तो नारा महाराष्ट्र, देशात खरा ठरला. महाराष्ट्राने उचलून धरला, असे भास्कर जाधव म्हणाले.

Roshan More

गिरीश कांबळे

Bhaskar Jadav News : शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन साजरा होतो आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्याने ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना वेगवेगळा वर्धापन दिन साजर करतायेत. मात्र, शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली असल्याचा प्रचार तसेच पोस्टरबाजी केली जात आहे. या पोस्टरबाजीला ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

भास्कर जाधव म्हणाले, 'मार्केटमध्ये गेल्यावर जो माल नकली असतो त्याची जास्त प्रसिद्धी करावी लागते.ओरडून ओरडून सांगावं लागतं.जो ओरिजनल असतो त्याला जाहिरातबाजी कारावी लागत नाही'.

उद्धव ठाकरे महाविकास आघाडी, काँग्रेससोबत असल्याने वर्धापन दिनाच्या दिवशीच नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचे भगवे रक्त नाही, अशी टीका केली होती. या टीकेला देखील जाधव Bhaskar Jadav यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. 'नितीश कुमार यांचं रक्त कसलं आहे? चिराग पासवानचं रक्त कसलं आहे? कोणीही असो रक्ताचा रंग एकच असतो, हे या निर्बुद्धांना माहीत नसेल आणि आमचं रक्त भगवं आहे आणि बाकीच्यांचं रक्त पवार साहेबांचं आहे. याचं आहे त्याचं आहे हे बोलणारे किती निर्बुद्ध आहेत, हे यातून स्पष्ट होतं ' असे भास्कर जाधव म्हणाले.

विधानसभेला कुठला नारा

नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली आणि यावेळी भाजपच्या BJP शीर्षस्थ नेत्यांनी आवाज दिला होता की 'इस बार चारसो पार' आणि त्याचवेळेला आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकच नारा दिला होता 'भाजप तडीपार' तो नारा महाराष्ट्र, देशात खरा ठरला. महाराष्ट्राने उचलून धरला. दोन महिन्यांनी जी विधानसभा आहे. त्यात सत्ता आणण्यासाठी उद्धव साहेब कोणता नारा देताहेत याकडेच महाराष्ट्राचे लक्ष आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.

शक्तिप्रदर्शन करणार

शिवसेनेच्या वर्धापन दिना निमित्त उद्धव ठाकरेंनी षण्मुखानंद सभागृहात, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळीच्या डोम येथे वर्धानपदिन साजरा करणार आहेत. वर्धापन दिनाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करत शिवसेनेचे दोन्ही गट विधानसभेची तयारी करतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT