Bhaskar Jadhav  sarkarnama
कोकण

Bhaskar Jadhav : 151 पैकी फक्त 17 नगरसेवक! कोकणात झालेल्या शिवसेनेच्या वाताहतीला शिंदेच जबाबदार, ठाकरेंच्या शिलेदाराचा हल्लाबोल

Bhaskar Jadhav On Eknath Shinde Over Municipal and Nagar Panchayat Elections : राज्यातल्या २८८ नगरपालिका, आणि २८५ नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांच्या निकालात महायुतीतल्या घटक पक्षांनी सरशी साधली असून, भाजपानं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीतल घटक पक्षांना अपेक्षित यश मिळालं नाही.

Aslam Shanedivan

  1. जिल्ह्यातील 7 स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी 6 ठिकाणी शिवसेना–भाजप महायुतीने निर्विवाद सत्ता मिळवली आहे.

  2. ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसत 151 पैकी केवळ 17 नगरसेवक निवडून आले.

  3. आमदार भास्कर जाधव यांनी या पराभवासाठी शिंदेंच्या शिवसेनेला जबाबदार धरले आहे.

Ratnagiri News : राज्यात पुन्हा एकदा विधानसभेनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आगाडीची धुळधाण झाली आहे. राज्यातीस २८८ नगरपालिका, आणि २८५ नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांच्या निकालात महायुतीतल्या भाजपानं सर्वाधिक जागा जिंकत मोठा भाऊ झाला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेसह अजितदादांच्या राष्ट्रवादीनेही दमदार कामगिरी केली आहे. तर जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीपैकी ६ ठिकाणी शिवसेना-भाजप महायुतीने निर्विवाद वर्चस्व राखले असून फक्त एका ठिकाणी महाविकास आघाडीने बालेकिल्ला राखला आहे. पण या निवडणुकीत नुकसान पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेचे झाले असून १५१ नगरसेवकांपैकी त्यांचे फक्त १७ नगरसेवक निवडून आले आहेत. यावरून कोकणातील एकमेव नेते आमदार भास्कर जाधव यांना छेडले असता त्यांनी या पराभवाचे खापर शिंदेंच्या शिवसेनेवर फोडले आहे.

यावेळी त्यांनी, कोकणात ठाकरे सेनेला यश मिळाले नाही. ही गोष्ट खरी आहे. कोकणातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आम्हाला फारसे यश मिळाले नाही, हे आम्ही कबूल करतो. पण त्याच बरोबर उभा महाराष्ट्रही हे कबुल करेल की, नाना तऱ्हेने उद्धव ठाकरे यांचा पक्ष तोडण्याचा, त्यांची माणसे विकत घेण्याचा त्यांना धाक दाखवण्यासह दपटशाही करून त्यांचे नामोहरम करण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतर सुद्धा आम्हाला यश मिळाले आहे. भलेही हे यश कमी असेल, पण यश मिळाले आहे. आमचे लोक या प्रचंड दादागिरी समोर, धनशक्ती समोर लढले. याचा अर्थ शिवसेनाप्रमुखांची पुण्याई कोकणात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचेच स्पष्ट होत आहे.

यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, आता तुम्हीच म्हणाला होतात की अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. आमचे नेते घरी जरी बसले होते. तरी सुद्धा आम्हाला एवढे यश मिळले. जर ते बाहेर पडले असते तर किती यश मिळाले असते आणि मग यांची अवस्था काय झाली असती. हे उभा महाराष्ट्रही बघितला असता.

नुकताच आलेल्या निकालानंतर ठाकरेंचा बालेकिल्ला असणाऱ्या कोकणात यंदा मात्र पूर्ण वाताहत शिवसेनेची झाल्याचे समोर येत आहे. खेड, रत्नागिरी, लांजा, चिपळूण येथे शिंदे शिवसेना, तर गुहागर, देवरूख येथे भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. राजापूर नगरपालिका काँग्रेसने काबीज केली आहे. दरम्यान किमान ती रत्नागिरीत होणार नाही अशी अपेक्षा अनेकांना होती. कारण येथे माजी खासदार विनायक राऊत आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव तळ ठोकून होते. मात्र निवडणुकीच्या आधीच येथे मविआत उडालेली ठिणगी, काँग्रेसला डावलले जाणे यासह अंतर्गत वादाची झळ निवडणूक निकालाला बसल्याचे दिसत आहे.

भास्कर जाधव यांनी त्यांना विश्वासात न घेता घेतलेल्या माजी खासदार विनायक राऊत यांनी स्वबळाचा नारा दिला होता. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. तर आमदार भास्कर जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) उमेदवाराच्या बाजूने रिंगणात उतरले होते. यामुळे मतदारापर्यंत फुटीचा मॅसेज गेला. यामुळे येथे २८ जागांपैकी फक्त ५ जागा शिवसेनेच्या आल्या. तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी आमदार रमेश कदम यांचाही पराभव झाला. जो भास्कर जाधव यांचा होण्या सारखा आहे.

रत्नागिरी पालिकेत नगरसेवक पदाच्या ३२ जागांपैकी २३ शिवसेना (शिंदे), ६ भाजप आणि ३ उद्धव ठाकरे सेना अशी स्थिती आहे. लांजा नगरपंचायतीत नगरसेवकपदाच्या १७ जागांमध्ये शिवसेना १०, भाजप १, अपक्ष ५ आणि उद्धव ठाकरे सेनेला १ जागा मिळाली आहे. गुहागर नगरपंचायतीत नगरसेवकपदाच्या १७ जागांमध्ये शिवसेना ८, भाजप ५, राष्ट्रवादी (अजित पवार गट) १, उद्धव ठाकरे सेना २ आणि मनसेला १ जागा मिळाली आहे. देवरुख नगराध्यक्षपदी भाजपच्या मृणाल शेट्ये यांनी विजय मिळवला. नगरसेवकपदाच्या १७ जागांमध्ये भाजप ३, शिवसेना ३, राष्ट्रवादी (अजित पवार) ४, अपक्ष ४, उद्धव ठाकरे सेनेने ३ जागा मिळवल्या आहेत.

FAQs :

1. जिल्ह्यात किती नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या?
४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या.

2. महायुतीला किती ठिकाणी यश मिळाले?
७ पैकी ६ ठिकाणी महायुतीने सत्ता मिळवली.

3. मविआने कुठे बालेकिल्ला राखला?
फक्त एका ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळाले.

4. ठाकरेंच्या शिवसेनेला किती नगरसेवक मिळाले?
एकूण 151 पैकी फक्त 17 नगरसेवक निवडून आले.

5. भास्कर जाधव यांनी पराभवासाठी कोणाला जबाबदार धरले?
शिंदेंच्या शिवसेनेला या पराभवासाठी जबाबदार धरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT