Bhaskar Jadhav : सभागृहात चिडचिड, तुटून पडणाऱ्या नितेश राणेंना भास्कर जाधवांनी डिवचलं, 'बाहेर मैदान मोकळं...' म्हणत सल्लाही दिला

Bhaskar Jadhav On Nitesh Rane : ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मत्सव्यावसायाबाबत बोलताना नितेश राणे यांनी उत्तर दिले. मात्र हे उत्तर भास्कर जाधव यांना काही पटले नाही आणि त्यांनी नितेश राणेंना डिवचत सल्ला दिल्याचे समोर आले आहे.
Maharashtra Assembly witnesses; Bhaskar Jadhav And Nitesh Rane
Maharashtra Assembly witnesses; Bhaskar Jadhav And Nitesh Ranesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मच्छिमारांच्या प्रश्नावरून विधानसभा सभागृहात भास्कर जाधव आणि नितेश राणे यांच्यात पुन्हा एकदा बाचाबाची झाली.

  2. भास्कर जाधवांनी “चिडचिडीसाठी विधीमंडळ नाही” असा टोला लगावत नितेश राणेंना डिवचले.

  3. नितेश राणेंनीही हसत खोपरखळी उत्तर दिल्याने हा प्रसंग चर्चेचा विषय ठरला.

Kokan/Nagpur News : राज्याच्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असून विरोधक सत्ताधाऱ्यांत सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. दरम्यान कोकणातील दोन नेत्यांमध्ये शुक्रवारी (ता.१२) विधानसभेत जुगलबंदी पाहायला मिळाली होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांच्यात आज मच्छिमारांच्या प्रश्नावरुन विधानसभा सभागृहात चिडचिड अन् बाचाबाची झाली होती. ती आजही होताना दिसली. पण यावेळी नितेश राणेंना भास्कर जाधवांनी डिवचत विधीमंडळ हे चिडचिड करण्यासाठी नसून त्यासाठी'बाहेर मैदान मोकळं असतं असे म्हणत टोला लगावला आहे. ज्यावर नितेश राणेंनी हसत उत्तर देत खोपरखळी मारली आहे. सध्या याचीच चर्चा सुरू आहे.

नुकताच विधानसभा सभागृहात मच्छिमारांच्या प्रश्नावरुन भास्कर जाधव यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. ज्यावर उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना यात खेचले होते. भास्कर जाधवांच्या शेजारी असलेल्या आदित्य ठाकरे यांनी उभे राहून भास्कर जाधव यांना मिठी मारली होती. त्यामुळे सभागृहात हशा पिकला होता. यावर नितेश राणेंनीही हसून दाद देताना मी आपल्यासमोरच ही मिटींग लावतो. कारण आपल्या अनुभवाचा फायदा आम्हाला पाहिजे, कोकणाला पाहिजे आणि मच्छिमारांनाही पाहिजे, असे म्हणत उत्तर दिले होते.

पण आज भास्कर जाधव यांनी नितेश राणे यांना, सभागृहात एखादा प्रश्न विचारला म्हणून चिडायचे नसते. त्यासाठी बाहेर मैदान मोकळे आहे. या गोष्टी सभागृहात चालत नाही, असा सल्ला दिला. त्यांनी कोकणातील समुद्रात परराज्यातील अवैध बोटींकडून मासेमारी होत असल्याचा मुद्दा उपस्थित करताना नितेश राणेंना टोला लगावला.

Maharashtra Assembly witnesses; Bhaskar Jadhav And Nitesh Rane
Bhaskar Jadhav : गुजराती आंबा, पॅकेज अन् 'कुठे गेले मंत्री' म्हणत भास्कर जाधवांनी सरकारला झाप झापलं

तसेच मंत्रिमहोदयांनी माझा प्रश्नच वाचला की नाही, याचाच आता डाऊट आहे. पण त्यांनी फक्त माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. त्यांच्याच खात्याने उत्तर देताना, 'महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमन 1981 सुधारित 2021 नुसार रत्नागिरीत 9 आणि सिंधुदुर्गात 19 अशा परराज्यातील नौकांवर' कारवाई केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

कोकणातील हे दोन्ही जिल्हे परराज्यात आहेत, की काय असा अर्थ ध्वनित होतो. त्यामुळे तुम्ही याबद्दल तुमच्या खात्याला जाब विचारला पाहिजे. तुमच्या खात्याने यामध्ये सुधारणा करुन घ्यावी, म्हणून निर्देश द्यावेत. लगेच चिडू नका. चिडायला बाहेर मैदान मोकळं आहे, इथे ते चालत नाही. आम्ही पण चिडण्यात कमी नाही. सध्या कोकणातील समुद्रात मोठ्याप्रमाणावर मासेमारी केली जात असून ती परराज्यातील बोटींकडून सुरू आहे, हेच सिद्ध होते. जो चिंतेचा मुद्दा असल्याचे भास्कर जाधव म्हणाले.

यावेळी त्यांनी कोकणातील समुद्रात गस्तीसाठी 4 आणि राज्याच्या 4 अशा आठ स्पीड बोटी असूनही त्या बंद असल्याचे पटलावर आणले आहे. तसेच बाहेरच्या बोटी या 400 ते 500 हॉर्सपॉवरच्या असल्याने त्यांना पकडणे कठीण जाते. यामुळे केंद्राच्या आणि राज्याच्या 8 स्पीड बोटी तातडीने सुरु कराव्यात, असेही भास्कर जाधव यांनी मागणी केली आहे.

भास्कर जाधव यांनी डिवचल्यानंतर निलेश राणे यांनी देखील उत्तर दिले. ते म्हणाले चिडणे आणि या प्रश्नाचा काही संबंध नाही. फक्त सगळ्या गोष्टी 2014 पूर्वीच झाल्या आहेत असे कोणाला वाटू नये म्हणून आपणच त्याची माहिती दिली. तर परराज्यातल्या बोटी येतात कोकणाच्या समुद्रात येतात. त्याच्यांकडे हत्यारेही असतात जे हल्ले करतात.

तर आपल्याकडे असणाऱ्या बोटी या लाकडी असून आता 15 स्टिलच्या गस्ती नौका मागवत आहोत. ड्रोनद्वारेही लक्ष ठेवले जाईल, असे त्यांनी उत्तर दिले आहे. तर भास्कर जाधव यांनी खात्याबाबत दिलेल्या सल्ल्याबाबत बोलताना, नितेश राणे यांनी आपल्या खात्याचे अधिकारी हे 100 टक्के प्रामाणिक आहेत असेही नाही, असाही खुलासा केला आहे.

Maharashtra Assembly witnesses; Bhaskar Jadhav And Nitesh Rane
Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांचा पारा चढला! विरोधी पक्षनेतेपदावर प्रश्न विचारताच पत्रकारांवरच भडकले? म्हणाले...

FAQs :

1. भास्कर जाधव आणि नितेश राणेंमध्ये वाद कशामुळे झाला?
मच्छिमारांच्या प्रश्नावरून विधानसभा सभागृहात चर्चा रंगली.

2. भास्कर जाधवांनी नितेश राणेंना काय म्हटलं?
विधीमंडळ हे चिडचिड करण्यासाठी नसून त्यासाठी बाहेर मैदान मोकळं असतं, असा टोला लगावला.

3. नितेश राणेंनी यावर कसं उत्तर दिलं?
हसत खोपरखळी मारत त्यांनी उत्तर दिलं.

4. हा वाद कुठे झाला?
महाराष्ट्र विधानसभा सभागृहात.

5. या घटनेची राजकीय चर्चा का होते आहे?
कारण हा वाद कोकणातील दोन प्रमुख नेत्यांमध्ये सभागृहात उघडपणे घडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com