Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Sarkarnama
कोकण

shivsena Vs shivsena UBT : कोकणात ठाकरेंची राजकीय चाल; शिंदेंच्या शिलेदाराच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या बड्या नेत्याची एन्ट्री, राजकीय वर्तुळात खळबळ

Milind Narvekar : कोकणातील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या दापोली मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी राजकीय चाल खेळली आहे.

Aslam Shanedivan

  1. मिलिंद नार्वेकर यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवड झाली आहे.

  2. ही नियुक्ती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या दापोली मतदारसंघात झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

  3. या निर्णयामुळे कोकणातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ratnagiri News : नुकताच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला कोकणात मोठे यश मिळाले आहे. तर कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला असणार्‍या कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पूर्ता वाताहात झाली आहे. येथे दापोली शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात भाजप, राष्ट्रवादी आणि उबाठा एकत्र आले होते. मात्र कदम यांनी आपला बालेकिल्ला अभेद्य ठेवत भगवा फडकवला होता. येथे जिल्हा परिषदेच्या ६ पैकी ६ आणि पंचायत समितीच्या १२ पैकी १० जागांवर विजय मिळवत विरोधकांना पराभवाची धूळ चारली होती. भाजप व राष्ट्रवादीला केवळ दोन गणांमध्ये यश मिळाले होते. तर ठाकरेंच्या शिवसेनेची धुळदान झाली.

पण आता उद्धव ठाकरेंनी कदम यांच्या दापोली मतदारसंघात राजकीय चाल खेळल्याची चर्चा सुरू आहे. येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले तथा विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांची थेट निवड झाली आहे. या निवडीनंतर आता कोकणातील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या असून कदमांच्या बालेकिल्ल्यात नार्वेकरांच्या एन्ट्रीने खळबळ उडाली आहे.

शिवसेनेत फुट पडल्यानंतर राजकीय भूकंप झाला होता. यावेळी एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी ठाकरे यांचे निकटवर्तीय नार्वेकर गेले होते. यानंतरच ते चर्चेत आले होते. या राजकीय भूकंपानंतर अनेकदा नार्वेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावरून देखील ते चर्चेत आले होते. तर ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशा वावड्या उठल्या होत्या. पण आजही नार्वेकर ठाकरेंच्याबरोबर आहेत.

दरम्यान आता नार्वेकर यांचे सर्वपक्षीय संबंध उत्तम असल्यानेच त्यांची कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवड करण्यात आली आहे. पण ही निवड सत्ताधारी पक्षाच्या जवळच्या व्यक्तीची होत असता ती विरोधात असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नार्वेकरांची झाल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

उपसचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई यांनी यांच्या पत्रात मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीच्या कार्यकारी परिषदेचे सन्माननीय सदस्य म्हणून नार्वेकर यांची निवड करण्यात आल्याचे म्हटले आहे. पण आता शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या बालेकिल्ल्यातील विद्यापीठावर सदस्य म्हणून नार्वेकर यांची निवड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

FAQs :

1. मिलिंद नार्वेकर यांची कोणत्या पदावर नियुक्ती झाली आहे?
त्यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवड झाली आहे.

2. ही नियुक्ती राजकीयदृष्ट्या का महत्त्वाची मानली जाते?
कारण ती योगेश कदम यांच्या बालेकिल्ल्यात झाली असून त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

3. दापोली मतदारसंघ कोणाच्या प्रभावाखाली मानला जातो?
तो गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा बालेकिल्ला मानला जातो.

4. या नियुक्तीचा कोकणातील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

5. मिलिंद नार्वेकर कोणत्या गटाशी संबंधित आहेत?
ते उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT