

Parbhani Mayor News : प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतलेल्या शिवसेनेला याच परभणी शहरातून पक्ष मान्यता आणि निवडणूक चिन्ह मिळाले होते. हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्वाला आज त्यांच्याच पक्षाच्या आमदार, खासदार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मूठमाती दिल्याची टीका परभणी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी केली.
परभणी महापालिकेच्या महौपार पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सय्यद इक्बाल यांची तर उपमहौपार पदी काँग्रेसच्या गणेश देशमुख यांची निवड झाली. यानंतर परभणी शिवसेना-काँग्रेस आघाडीकडून जल्लोष सुरू आहे. रस्त्यावर भगवा आणि हिरवा गुलाल, फटाके फोडून आनंद साजरा केला जात असतानाच भाजपने मात्र पुन्हा शिवसेनेवर हिंदुत्वाला मूठमाती दिल्याचा आरोप केला आहे.
जनाब खासदार संजय जाधव, जनाब आमदार राहुल पाटील हे हिंदुत्ववादी मतांवर गेल्या अनेक वर्षांपासून निवडून येत आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वाला पसंती देत याच परभणीकरांनी पक्षाला मान्यात आणि चिन्ह मिळवून दिले होते. पण याच परभणीत सत्तेसाठी उद्धव ठाकरेंच्या या 'जनाब सेनेने' मुस्लिम महापौर करत आम्हाला हिंदुत्वाशी काही देणंघेणं नाही हे कृतीतून दाखवून दिले आहे.
भविष्यात परभणीतील हिंदुत्ववादी जनता उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत कधीही जाणार नाही. परभणीत मुस्लिम महापौराची निवड करून उबाठा गटाने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की त्यांची शिवसेना आता 'जनाब सेना' झाली आहे. सत्तेसाठी भगवा सोडून हिरवा हाती घेतला, बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली !
परभणी महापालिकेत शिवेसना उद्धव बाळासाहबे ठाकरे पक्षाचे 25 तर काँग्रेसचे 12 नगरसेवक निवडून आले होते. बहुमतासह आघाडीने सत्ता मिळवल्यानंतर आज प्रत्यक्षात महापौर, उपमहापौर पदासाठीची निवडणूक झाली. चंद्रपूर महापालिकेत शिवसेना (ठाकरे) नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. या जोरावर तिथे भाजपने आपला महापौर केला. याचे पडसाद परभणी महापौर पदाच्या निवडणुकीत उमेटल असा दावा केला जात होता.
परंतु खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी योग्य समन्वय राखत महापौर, उपमहापौर पदावर अपेक्षेप्रमाणे आपापले उमेदवार निवडून आणले. महापौर पद हे शिवसेनेच्या सय्यद इक्बाल यांना तर उपमहापौर पदी काँग्रेसच्या गणेश देशमुख यांना संधी मिळाली. शिवसेना-काँग्रेस आघाडी कायम राहिल्याने संधीच्या शोधात असलेल्या भाजपाचा भ्रमनिरास झाला. त्यानंतर आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.