Shivsena UBT; Uddhav Thackeray sarkarnama
कोकण

Shivsena UBT : ठाकरेंनी भाकरी फिरवली, शिवसेनेत मोठे फेरबदल, कोकणात जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी नव्या नेतृत्वाकडे

Uddhav Thackeray Shivsena Panvel Announces Major Organizational Changes : सार्वत्रिक निवडणुकांनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं महत्त्वाचे पाऊल उचल पक्षात मोठे फेरबदल केले आहेत.

Aslam Shanedivan

  1. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पनवेल परिसरात संघटना मजबूत करण्यासाठी नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

  2. दीपक निकम यांची जिल्हाप्रमुखपदी तर अॅड. समाधान काशीद यांची नवे पनवेल महानगरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

  3. रामदास पाटील आणि भरत पाटील यांनाही उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Panvel Shivsena UBT : राज्यात नुकताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या असून कोकणात पुन्हा एकदा महायुतीला मोठं यश मिळाले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. यानंतर येथे पक्षांतर फेरबदल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी भाकरी फिरवली आहे. आगामी काळात पनवेल परिसरात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलली आहे.

जिल्हाप्रमुखासह महानगरप्रमुख बदलण्यात आला आहे. तसेच उपजिल्हाप्रमुखांच्या देखील नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्या शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अनंत गीते, माजी आमदार बाळ माने, उपनेते बबन पाटील, संपर्कप्रमुख प्रसाद भोईर आणि सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी (८ में) पक्षाकडून या नव्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

पनवेल तालुक्यात नुकताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. ज्यात ठाकरेंच्या शिवसेनेला यश आले नाही. पण पनवेल महानगरपालिकेत शिवसेनेची मशाल धगधगली. महानगरपालिकेत पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले. तर अनेक प्रभागांमध्ये मशाल चिन्हावर लढलेल्या उमेदवारांनी चार ते पाच हजारांच्या दरम्यान मतदान घेतले. यामुळे भविष्यात योग्य लक्ष दिल्यास येथे शिवसेनेला सुगीचे दिवस असतील असे सध्याचे चित्र आहे. यामुळेच पनवेलमध्ये संघटनात्मक दृष्टिकोनातून पक्षात फेरबदल करण्यात आल्याची चर्चा आहे.

ज्येष्ठ शिवसैनिक दीपक निकम यांच्यावर जिल्हाप्रमुखपदाची तर अॅड. समाधान काशीद यांच्यावर शिवसेनेची जबाबदारी देण्यात आली आहे. तर रामदास पाटील आणि भरत पाटील यांची उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिवसैनिक निकम हे १९८० पासून शिवसेनेत सक्रिय असून त्यांनी दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली देखील काम केलं आहे. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरूवात ठाण्यातून केली.

तसेच दीपक निकम यांनी नवी मुंबई आणि रायगड परिसरात शिवसेना वाढत गणेश नाईक यांच्या समवेत काम केले. राज्यात एकीकडे राजकीय उलथापालत होत असताना त्यांनी शिवसेना सोडली नाही. त्यांच्या याच निष्ठेचे फळ म्हणून शिवसेनेनं जिल्हाप्रमुखपदाची जबाबादारी त्यांच्यावर सोपवली आहे.

FAQs :

1. पनवेलमध्ये कोणत्या नवीन नियुक्त्या जाहीर झाल्या?

दीपक निकम यांची जिल्हाप्रमुख आणि अॅड. समाधान काशीद यांची महानगरप्रमुख म्हणून नियुक्ती झाली.

2. या नियुक्त्या कोणत्या पक्षाने केल्या?

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

3. पक्षाने हा निर्णय का घेतला?

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

4. उपजिल्हाप्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली?

रामदास पाटील आणि भरत पाटील यांची उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

5. समाधान काशीद यांची ओळख कशी आहे?

समाधान काशीद हे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT