Shivsena UBT Politics : ठाकरेंच्या शिवसेनेची पुणे कार्यकारिणी बरखास्त होणार, भाकरी फिरवण्यासाठी राऊत पुण्यात?

Shiv Sena UBT Pune : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग 16 हडपसर-सातववाडी मधून नितीन गवडे हे एकमेव ठाकरे सेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. 2017 च्या निवडणुकांमध्ये एक संघ असणाऱ्या सेनेने 10 जागांवर विजय मिळवला होता.तर यंदा ठाकरे एक ठिकाणी विजयी झाली तर शिंदे सेनेला भोपळाही फोडता आला नाही.
Uddhav Thackeray- Sanjay Raut
Sanjay Raut addresses Shiv Sena UBT leaders in Pune after election setback, focusing on rebuilding party strength and strategy.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 29 Apr : नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठ्या प्रमाणात पीछे हट झाल्याचं पाहायला मिळालं. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने मिळून तब्बल 90 जागांवर ही निवडणूक लढवली होती. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त एकाच जागेवर विजय मिळवता आला.

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग 16 हडपसर-सातववाडी मधून नितीन गवडे हे एकमेव ठाकरे सेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. 2017 च्या निवडणुकांमध्ये एक संघ असणाऱ्या सेनेने 10 जागांवर विजय मिळवला होता.तर यंदा ठाकरे एक ठिकाणी विजयी झाली तर शिंदे सेनेला भोपळाही फोडता आला नाही.

त्यामुळे ठाकरे सेनेचे पुणे महापालिकेत अस्तित्व टिकून ठेवणाऱ्या नितीन गावडे यांना ठाकरे सेनेकडून ताकद देण्यात येणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Uddhav Thackeray- Sanjay Raut
Gokul Administrator : CM फडणवीसांनी अर्ध्या तासांतच संपवला 'गोकुळ'चा विषय : धनंजय महाडिकांकडे येणार सूत्र?

त्यामध्ये संजय राऊत हे स्वतः पुणे महापालिकेत येऊन पालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेता पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच त्यानंतर सारसबागेजवळील व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे कलादालनात दुपारी पुणे शहर शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून, त्यामध्ये खासदार संजय राऊत मार्गदर्शन करणार आहेत.

Uddhav Thackeray- Sanjay Raut
Raghav Chadha controversy : 'बहिणीसाठी प्रियांका चोप्राची मध्यस्ती अन् राघव चड्ढा भाजपमध्ये...', नवजोत कौर सिद्धू यांचा खळबळजनक दावा

महापालिका निवडणुकीपूर्वीपासून पुण्यातील ठाकरे सेनेचे शहराध्यक्ष आणि इतर संघटनात्मक बदल करावे अशी मागणी केली जात आहे. मात्र हे संघटनात्मक बदल महापालिका निवडणुकीनंतर करण्यात येतील ते त्यावेळी सूचित करण्यात आले होते. त्यानंतर आता महापालिकेत झालेल्या दारुण पराभवानंतर संघटनात्मक बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

त्या दृष्टिकोनातून ही बैठक घेण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे बैठकीनंतर लवकरच शहरातील संघटन अधिक बळकट व्हावं या दृष्टिकोनातून सध्याची कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्यकारणी निर्माण करण्यात येणार असल्याचे देखील सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com