Bhaskar Jadhav sarkarnama
कोकण

Bhaskar Jadhav : ठाकरेंना पुन्हा धक्का? भास्कर जाधवांचा व्हॉट्सअप बॉम्ब! 'चापलूसों की जमात...' म्हणत दिला सूचक इशारा

Bhaskar Jadhav Whatsapp Status : शिवसेनेत खासदार फुटल्याने आधीच टेन्शनमध्ये असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधव यांच्यातील वादाने आणखी पेच वाढवला आहे.

Aslam Shanedivan

Maharashtra Politics : शिवसेनेत खासदार फुटल्याने मोठे वादळ आले असून ते आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होतं आहे. ते येण्याआधीच थोपवण्यासाठी उद्धव ठाकरेंसह त्यांचे शिलेदारांनी कंबर कसली आहे. पण बाहेरच्या वादळापेक्षा आता पक्षातील अंतर्गत कलह आणि वाद काही थांबताना दिसत नाही. नुकताच सुरू झालेल्या मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधव यांच्यातील वादही काही थांबेल असे दिसत नाही.

नार्वेकर यांनी ट्विट करत डिवचल्यानंतर भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिले होते. पण आता त्यांनी व्हॉट्सअप बॉम्ब टाकत ठेवलेले स्टेटस पक्षात सगळंच अलबेल नाही हे सांगणारे आहे. तर भास्कर जाधव काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत की काय अशी देखील चर्चा सुरू झाली असून या स्टेटसला नार्वेकर यांच्याशी झालेल्या वादाशी जोडले जात आहे. यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात भास्कर जाधवांच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीका करत एक ट्विट केले होते. ज्यात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील टॅग केले होते. तर विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने ते “फ्रस्ट्रेट” झाले आहेत. यामुळे आमच्या सारख्या शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचा दावा मिलिंद नार्वेकर यांनी केला होता.

त्यानंतर भास्कर जाधव यांनी देखील आपल्या डोक्यात आमचे नेते मिलिंद नार्वेकर नाही ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर होते. यातूनच मी ते बोलून गेलो. मिलिंद नार्वेकर माझे चांगले मित्र आहेत. त्यांचे इतर पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. कदाचित यातूनच ते माझ्यासाठी विरोधी पक्षनेतेपद घेत असतील. तो प्रश्न आता लवकरच सुटेल अशी अपेक्षा म्हणत या चर्चेला पूर्णविराम दिला होता.

यानंतर भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील वाद संपल्याचे बोलले जात होते. मात्र भास्कर जाधव यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटस वर “चापलूसों की जमात में सीधे खड़े आदमी पर भी, अकड़ने की तोहमत लग जाती है.” असे लिहले आहे. या पोस्टमध्ये कोणाचाही थेट उल्लेख नसल्याने हे शब्द नेमके कोणासाठी उद्देशून होते असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील वादाच्या दरम्यानच त्यांनी सोशल मीडियावर ठेवलेले स्टेटस सूचक इशारा देणारा असल्याचे आता बोलले जात आहे. यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून भास्कर जाधव काही वेगळा निर्णय घेतात की काय अशा देखील चर्चा रंगल्या असून या व्हॉट्सअप स्टेटसमुळे विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT