Uddhav Thackeray News Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray News : 'सत्ताधाऱ्यांमध्ये गँगवाॅर, मिंदे गँग आणि फडणवीस गँग...' उद्धव ठाकरेंनी सुनावले

Shivsena :सत्तेच्या लोभापाई तुम्ही पक्षात बाजारबुणगे घेतले. हे तुमचे हिंदुत्व आहे का? असा सवाल करत ठाकरे यांनी भाजपला डिवचले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Sindhudurg : कोकण दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी कुडाळ मधील आपल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला केला. नारायण राणेंच्या होम ग्राऊंडवर सभा घेत राणेंवर देखील टीकेची झोड उडवली. 'तुम्ही विनायक राऊत आणि वैभव नाईक यांना निवडून दिले नसते तर इकडे गँगवार झाले असते. सत्ताधारी पक्षामध्ये आता गँगवार सुरु आहे. मिंदे गँग आणि फडणवीस गँग, पोलिस ठाण्यामध्ये गोळीबार होतोय' असा थेट हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला. (Uddhav Thackeray News)

'वैभवला आणि विनायक राऊत (Vinayak Raut) यांना निवडून देत इथल्या गुंडगर्दी करणाऱ्या घराणेशाहीचा सुपडा साफ करून टाकला, अशा शब्दात ठाकरे यांनी राणे यांच्यावर नाव न घेता तोफ डागली . जर सर्वसामान्य माणूस एकटवला तर काय करू शकतो हे तुम्ही कोकणवासियांनी दाखवून दिले आहे. हुकूमशाही गुंडशाही गाडून दाखवले आहे आणि म्हणून हाच संदेश घेऊन मी बांदा ते चांदा दौरा करत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सत्तेच्या लोभापाई तुम्ही पक्षात बाजारबुणगे घेतले. हे तुमचे हिंदुत्व आहे का? असा सवाल करत ठाकरे यांनी भाजपला डिवचले. मला संघाच्या माणसांबद्दल आदर आहे. त्यांनी वर्षानूवर्ष पिढ्यानपिढ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून यांच्या पालख्या वाहिल्या. पण यांची वृत्ती वापरा आणि फेका अशी आहे. जसे शिवराज सिंग चौहाण, वसुंधरा राजे, रमणसिंग यांना फेकले तसे इकडे देवेंद्र यांना फेकले.

कायदा आमच्या संरक्षणासाठी आहे. पण पोलिस ठाण्यात गोळीबार होतोय. मी गणपत गायकवाड याची बाजू घेत नाही. गायकवाेने स्टेटमेंट दिलं आहे. पोलिस ठाण्यातले सीसीटीव्ही फुटेज बाहेर कसे आले. शिंदे जो पर्यंत मुख्यमंत्री आहे तो पर्यंत गुंडांची पैदास होईल, हे भाजपच्या आमदाराचे वक्तव्य आहे. गायकवाडचे करोडो रुपये मिंध्यांकडे आहेत, त्याची चौकशी होणार आहे की नाही? असा सवाल देखील ठाकरे यांनी उपस्थित केला.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT