Narayan Rane Vs Vinayak Raut: कोण विनायक राऊत? काय त्यांची औकात?; राणेंनी उडवली खासदाराच्या उपोषणाची खिल्ली

Narayan Rane Criticized Raut: शरद पवार यांच्याकडे केंद्रीय कृषिमंत्रीपद देणार का?
Vinayak Raut & Narayan Rane
Vinayak Raut & Narayan RaneSarkarnama

New Delhi : कोण विनायक राऊत? काय औकात आहे त्यांची? गेल्या १० वर्षांत त्यांनी काही योजना आणली का? असा सवाल करत उपोषण काय करता त्यांना हवी असेल तर बिर्याणी पाठवतो, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या उपोषणाची खिल्ली उडवली. (Who is Vinayak Raut? : Narayan Rane)

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत हे कोकणातील प्रश्नावर उपोषण करीत आहेत. त्याबाबत केंद्रीय मंत्री राणे यांना विचारले असता त्यांनी उसळून कोण विनायक राऊत, काय त्यांची औकत असे प्रश्न पत्रकारांनाच विचारले. राऊत आणि राणे यांच्यातून विस्तवही जात नाही. त्या पार्श्वभूमीवर राणेंनी राऊत यांच्या उपोषणाची खिल्ली उडवली.

Vinayak Raut & Narayan Rane
Shiv Sena Election strategy : पवार काका-पुतण्याच्या भेटीने उद्धव ठाकरे सावध; लोकसभेसाठी स्वतंत्र रणनीती, उद्यापासून मॅरेथॉन बैठका

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भविष्यात काँग्रेस आणि शिवसेना भाजपविरोधात एकत्र येतील का? अशी विचारणा केली असता राणे म्हणाले की, दोन्ही पक्ष मिळून ३६ जण एकत्र येऊन काही फायदा होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तिघे होते, त्यावेळी ते काही करू शकले नाहीत. आता कमी जास्त झाले, तरी काही होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

येत्या काळात काँग्रेसचे काही आमदार भाजपकडे येणार आहेत, त्यामुळे भाजपची ताकद वाढणार आहे. भविष्यात काँग्रेस व ठाकरे गटाकडे फारसे आमदार राहणार नाहीत, असा दावाही नारायण राणे यांनी या वेळी बोलताना केला.

Vinayak Raut & Narayan Rane
kolhapur Maratha Reservation Meeting : अजितदादांसमोर कोल्हापुरात प्रचंड गदारोळ; मराठा आरक्षणाच्या बैठकीत बाचाबाची

शरद पवार यांच्याकडे केंद्रीय कृषिमंत्रीपद देणार का, असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी तो विषय माझा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यावर बोलतील, असे सांगून राणे यांनी या प्रश्नावर अधिक बोलणे टाळले.

Vinayak Raut & Narayan Rane
Solapur BJP News : सोलापुरात भाजपला धक्का; जिल्हा उपाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना

आज देशाचा स्वतंत्र दिवस असून देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देशाच्या प्रगतीबद्दल, सर्वांच्या विकासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केले. त्यासोबतच कारागिरांच्या प्रगतीसाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे, असेही राणे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com