Thane : शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात गोळीबार केला. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात धाव घेत महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची माहिती डाॅक्टरांकडून घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नंतर आज (रविवारी)ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे महेश गायकवाड यांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेले. मात्र, रुग्णालयातून बाहेर आल्यावर मात्र शंभूराजे देसाई हे महेश गायकवाड यांचे नावच विसरले.
रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, मला त्यांच्याशी बोलता आले नाही. फक्त मी त्यांना पाहिले. डॉक्टरांनी म्हटले नुसते बघा, जास्त वेळ थांबू नका. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना फक्त पाहिले. गायकवाड यांच्या तब्बेची चौकशी डाॅक्टरांकडे केली. गायकवाड नाव येताच शंभूराज देसाई यांनी पॉज घेतला. गायकवाड यांचे नाव उपस्थितांमध्ये विचारून मग महेश गायकवाड (Mahesh Gaikwad ) असा उल्लेख देसाई यांनी केला.
मंत्री शंभूराज देसाई यांनी रुग्णालयात खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार शहाजी पाटील, माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या उपस्थितीत गायकवाड यांची विचारपूस करत डॉक्टरांशी चर्चा केली. डाॅक्टरांचे उपचार सुरू आहेत. काळजी करू नका, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवू आहे. उपचार आणि प्रयत्न सुरू असल्याने गायकवाड न बरे होतील, अशी प्रार्थना करूया असे देसाई देखील देसाई म्हणाले.
कोकण दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे हे गोळीबार प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत आहेत. गोळीबाराचा सीसीटीव्ही बाहेर कसा आला, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मात्र, ठाकरेंना कुठलेही प्रत्युत्तर शंभूराज देसाई यांनी दिले नाही. आपण प्रवास होता त्यामुळे ते काय बोलले आपल्याला माहीत नाही. माहिती घेतो आणि मग बोलतो, असे सांगितले. दरम्यान, रुग्णालयात उपस्थित असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.