Sharad Pawar-Uddhav Thackeray-Bhaskar Jadhav Sarkarnama
कोकण

Bhaskar Jadhav Video : भास्कर जाधवांवर उद्धव ठाकरे नाराज, 'मातोश्री'वरून पाठवला खास संदेश? शरद पवारांच्या उमेदवाराचे कनेक्शन समोर

Bhaskar Jadhav Uddhav Thackeray : भास्कर जाधव यांनी पक्षाच्या विरोधात जात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला पाठींबा दिल्याने त्यांना 'मातोश्री'वरून समज दिला असल्याची चर्चा आहे.

Roshan More

Bhaskar Jadhav News : आमदार भास्कर जाधव यांच्यावर उद्धव ठाकरे नाराज असल्याच्या चर्चा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चिपळूनमध्ये दिलेल्या नगराध्यक्षाच्या उमदेवारा ऐवजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार रमेश कदम यांना जाहीर पाठींबा दिला. येवढेच नाही तर ते थेट कदम यांच्या प्रचारासाठी देखील गेले.

जाधव यांच्या या निर्णयानंतर मातोश्रीवरून त्यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.पक्षाचे नुकसान होईल, असे पाऊल उचलू नका, असे संदेश त्यांना मातोश्रीवरून पाठवून त्यांना समज दिल्याची चर्चा आहे.

चिपळून नगरपालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढत आहे. त्यांनी नगराध्यक्षपदास 24 नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. मात्र, भास्कर जाधव यांनी पक्षाच्या उमदेवाराच्या विरोधात भूमिका घेत शरद पवारांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार रमेश कदम यांना पाठींबा दिला आहे.

माजी खासदार विनायक राऊत यांच्यासोबत भास्कर जाधव यांचे मतभेद असल्याची चर्चा आहे. यापूर्वी देखील भास्कर जाधव यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. मात्र, स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत दोघांमधील तणावामुळे जाधव यांनी थेट पक्षाच्या उमदेवाराच्या विरोधात भूमिक घेतली असल्याचे बोलले जात आहे.

जाधवांनी केला कदम यांचा प्रचार

भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत आधीच स्पष्ट केले होते की, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून तिढा सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेतला होता. त्यामुळे परिणामांची चिंता न करता रमेश कदम यांचा प्रचार करणार असल्याचे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार त्यांनी गुरुवारी (ता.27) जाधव यांनी चिपळूनमध्ये कदम यांचा प्रचार केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT