Thane News : उल्हासनगर महापालिकेतील बहुचर्चित सात स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीनंतर भाजप-शिवसेनेच्या युतीत मिठाचा खडा पडला आहे. छाननीदरम्यान तांत्रिक त्रुटींमुळे कपिल अडसूळ आणि रामचंदानी यांचे अर्ज बाद करण्यात आले. यानंतर आता भाजपने थेट पत्रकार परीषद घेत शिवसेनेवर टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी आमदार कुमार आयलानी, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारीया यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेविरोधात एल्गार केला आहे. यावेळी त्यांनी आता आमदार, जिल्हाध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी हा निर्णय घेतला आहे की आम्ही सत्तेत बसणार नसून विरोधात बसू. युतीतून बाहेर पडत आहोत, अशी घोषणा आमदार कुमार आयलानी केलीय.
आज नेमकं काय घडलं याबाबतची सर्व माहिती आम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देणार आहोत. तर आमचे नगरसेवक असो किंवा मंडळ अध्यक्ष कोणीच या युतीत आनंद नाही. तर आमच्या सोबत युतीत असणारेच आमच्या विरोधकांना ताकद देण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील आयलानी यांनी केला आहे.
आमदार-खासदार हे शहराच्या विकासाठी निवडणूक लढवतात. पण विनाशकारी माणसं ही आज आमच्या डोक्यावर बसवून निर्णय घेतले जात आहेत. याआधी महायुतीच्या बैठकीत भाजपचे चार स्वीकृत नगरसेवक निवडले जातील असे ठरले होते.
पण सर्वसाधारण सभेच्या आदल्या दिवशी बैठक घेण्यात आली सभेत देखील पूर्ण टाईम पास करण्यात आला. तर शेवट्या क्षणाला शिवसेनेचे पाच आणि भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत वाजवण्यात आले. हे काय योग्य नाही, असेही नाराजी आयलानी यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी पत्रकारांनी आपण युतीत राहणार का असा सवाल उपस्थिती केल्यानंतर आयलानी यांनी आम्ही युतीत राहणार नाही, आम्हाला अशी सत्ता नको आहे. शहराच्या विकासाचा मुद्दा असेल त्यावेळी आम्ही सोबत असू. पण इतर कोणत्याच मुद्द्यावर आम्ही एकत्र असणार नाही.
यावेळी त्यांना खासदार श्रीकांत शिंदे त्यांना आता मदत करणार का? असा सवाल करण्यात आला. ज्यावर आयलानी यांनी, आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. पण आता उल्हासनगर महापालिकेच्या संदर्भात तरी आमचे ठरले आहे, की आम्ही त्यांच्यासोबत बसणार नाही. दरम्यान या सर्व राजकीय घडामोडींमुळे उल्हासनगरचे राजकीय वर्तुळ चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.