Narayan Rane, Uddhav thackeray News Sarkarnama
कोकण

Narayan Rane News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अवमान प्रकरणात नारायण राणेंना मोठा दिलासा

Uddhav Thackeray News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अवमान प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Narayan Rane News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अवमान प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. अलिबाग न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी हा निर्णय दिला आहे. पुरेसा पुरावा नसल्याने दोषमुक्त करावे यासाठी वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयामध्ये अर्ज केला होता.

यामुळे नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याच प्रकरणात त्यांना अटकही झाली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

केंद्रीय मंत्री झाल्यानंतर राणे यांनी जनआशीर्वाद यात्रा काढली होती. यात्रेदरम्यान रायगड जिल्ह्यात महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर महाड शहर पोलिस ठाण्यात राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राणे यांचे अटकनाट्य मोठ्या प्रणाणात रंगले होते.

या प्रकरणी अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. राणे यांचे वकील ॲड. सतीश मानेशिंदे यांनी जोरदार युक्तिवाद करताना राणे यांच्यावर शिक्षा करण्याइतका गंभीर गुन्हा नसल्याने म्हटले होते. तसेच पुरेसा पुरावा दोषारोप पत्रात दिसत नसल्याचा युक्तीवाद त्यांनी केला होता. त्यामुळे राणे यांना न्यायालयाने दोषमुक्त करावे, अशी विनंती केली होती. ती न्यायालयाने मान्य केली. त्यानुसार राणे यांना दोषमुक्त करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT