Thackeray Vs Shinde : उदय सामंतांचा गौप्यस्फोट : ठाकरे गटातील १३ आमदार आमच्या संपर्कात

आम्ही खेडमधील विक्रमी सभा दाखवून दिली आहे. भाजप-शिवसेनेची सभा झाली तर अनेक विक्रम मोडेल.
Uday Samant-Uddhav Thackeray
Uday Samant-Uddhav ThackeraySarkarnama

रत्नागिरी : ठाकरे गटातील १३ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे उद्योगमंत्री आणि उपनेते उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे. शिंदे गटातील 28 आमदार भाजपमध्ये जाणार, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्याला उत्तर देताना सामंत यांनी हे स्पष्ट केले. (Uday Samant's secret explosion : 13 MLAs from Thackeray group in touch with us)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जागाही शिवसेना लढणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. वि. दा. सावरकर नाट्यगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेवेळी राजकीय विषयावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच शिंदे गटातील ४० आमदारांबाबत वक्तव्य केले.

Uday Samant-Uddhav Thackeray
Junnar News : खासदार कोल्हेंची मागणी डावलून जैविविधता मानके चित्ररथ जुन्नरऐवजी बारामतीला दिला!

ते म्हणाले, आगामी काळात ४० पैकी २८ आमदार भाजपमध्ये जाणार आहेत. याला प्रत्युत्तर देताना सामंत म्हणाले की, खासदार संजय राऊत म्हणजे सकाळी नऊचे बातमीपत्र आहे. आमचे २८ सोडा, ठाकरे गटातील राहिलेले १३ आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते काही म्हणतील असे चालणार नाही. महाविकास आघाडीने सभा घेतली की, त्याला उत्तर दिलेच पाहिजे, असे काही नाही.

Uday Samant-Uddhav Thackeray
Solapur News : पाणीप्रश्नावर सुभाष देशमुख आक्रमक....थेट देवेंद्र फडणवीसांना लावला फोन!

आम्ही खेडमधील विक्रमी सभा दाखवून दिली आहे. भाजप-शिवसेनेची सभा झाली तर अनेक विक्रम मोडेल. तुम्ही महाविकास आघाडीच्या सभा पाहिल्या तरी शरद पवार, अजित पवार आणि थोरात यांची भाषणे विधायक आणि विकासकामांवर आहेत. परंतु ठाकरे सेनेची भाषणे एककलमी शिंदे गटावर खोके घेतल्याचे आरोप करणारी आहेत. महापालिकेत किती खोकी घेतली, हे बोलणारे आमच्याकडेपण आहेत; परंतु राजकारणातील आचारसंहिता आम्ही पाळतो.

Uday Samant-Uddhav Thackeray
B. S. Yediyurappa News : येडियुरप्पांचा ‘यु टर्न’ : सिद्धरामय्यांच्या विरोधात मुलगा विजयेंद्र लढणार नसल्याची केली घोषणा

देशात वि. दा. सावरकरांवरून वाद सुरू आहेत. यात गौरवयात्रा काढणे योग्य आहे का? यावर सामंत म्हणाले, आम्ही सावरकरांचा इतिहास लोकांपुढे ठेवण्यासाठी गौवरयात्रेचे नियोजन केले आहे आणि ती काढणार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com