Nitesh Rane and Narayan Rane Sarkarnama
कोकण

मुलाच्या अटकेवर नारायण राणेंचे मौन पण सोमय्यांवर हल्ला होताच गेले धावून!

आमदार नितेश राणेंच्या अटकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मौन धारण केले आहे.

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नितेश यांच्या अटकेवर त्यांचे पिता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मौन धारण केले आहे. याबद्दल त्यांनी एक चकार शब्दही काढला नाही. मात्र, भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसैनिकांनी केल्यानंतर आता नारायण राणे शिवसेनेवर (Shivsena) भडकले आहेत.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंना अटक झाली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रकृती बिघडल्याने त्यांना कोल्हापूरला हलवण्यात आले आहे. नितेश यांना अटक होताच राणे दिल्ली सोडून कणकवलीत दाखल झाले आहेत. मात्र, त्यांनी मुलाच्या अटकेबाबत मौन धारण केले आहे. याबद्दल ते एक शब्दही माध्यमांशी बोलले नाहीत. तसेच, सोशल मीडियावरही त्यांनी याबद्दल काही म्हटलेले नाही.

दरम्यान, किरीट सोमय्या हे शिवसैनिकांशी झालेल्या झटापटीत जखमी झाले होते. यावरून मात्र, नारायण राणे आता भडकले आहेत. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात शिवसेना कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. असे हल्ले भाजप कधीही सहन करणार नाही. यास जशास तसे उत्तर दिले जाईल. सोमय्याजी यांनी सुरू केलेल्या लढाईत ते एकटे नसून संपूर्ण पक्ष त्यांच्यासोबत आहे. आमची ही लढाई कायद्याच्या मार्गाने सुरू राहील.

भ्रष्टाचाराच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी सुरू केलेल्या मोहिमेला घाबरून त्यांच्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला आहे, हे उघड आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे नेतेही भ्रष्टाचाराने माखलेले आहेत. अशा नेत्यांवर जनतेने हल्ला केल्यास त्यांना काय वाटेल.. अशा भ्रष्ट नेत्यांवर खरं तर शेणाचे हल्ले केले पाहिजेत. अशा भ्याड हल्ल्यानंतर किरीट सोमय्या किंवा भाजप शांत बसेल या भ्रमात महाविकास आघाडी सरकारने राहू नये, असे राणेंनी म्हटले आहे.

सोमय्या हे 5 फेब्रवारीला महापालिकेत आले असतानाता शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. संतापलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या कारच्या काचांवर हाताने ठोसे मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. मात्र आक्रमक शिवसैनिकांशी झालेल्या झटापटीत किरीट सोमय्या अक्षरश: महापालिकेच्या पायऱ्यांवर पडले. किरीट सोमय्यांच्या सुरक्षारक्षकांनी शिवसैनिकांना बाजूला करत त्यांना बाहेर काढले. यात सोमय्या जखमी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT