Vaibhav Naik broken Pwd office sarkarnama
कोकण

Video Vaibhav Naik : ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी PWD चं कार्यालय फोडलं, गंभीर कारण आलं समोर

Roshan More

Vaibhav Naik News : केवळ आठ महिन्यांपूर्वी मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवलेला पुतळा आज (सोमवारी) कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पुतळा कोसळल्यानंतर पुतळ्याच्या कामाविषयी गंभीर प्रश्न ठाकरे गटाकडून उपस्थित केले जात होते.

पुतळा कोसळल्याने ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक संतप्त झाले. त्यांनी मालवणमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्लूडी) कार्यालयात घूसन तोडफोड केली.

आमदार वैभव नाईक पुतळा कोसळ्यानंतर तिखट प्रतिक्रिया दिली होती.वैभव नाईक म्हणाले, शिवाजी महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे कोसळला आहे. शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. कोट्यावधीचा खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला होता. पुतळ्याचे काम सुरू होते तेव्हा स्थानिक नागरिकांनी देखील तक्रारी केल्या होत्या. पण त्यावेळी त्यांच्याकडे लक्ष दिल नाही.

'400 वर्षापूर्वी महाराजांनी बांधलेल्या किल्याच्या एकही चिरा ढासळला नाही , पण सहा महिन्यापूर्वीच्या कामाचे ढासळले. या प्रकरणी आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहोत. शिवप्रेमींनी शांततेत आंदोलन करावे.', असे आवाहन देखील वैभव नाईक यांनी केले.

खासदार अमोल कोल्हे यांनी देखील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने संताप व्यक्त केला. पुतळा उभारणारे कंत्राटदार यांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. भंग पावलेला पुतळा पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा, अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT