Sanjay Raut News: महिलेचं उद्धव ठाकरेंना पत्र, संजय राऊतांवर गंभीर आरोप; 'त्यांनी माझा पाठलाग केला, फोनवरून मला...'

Swapana Patkar Letter to Uddhav Thackeray : ज्या पत्राचाळ प्रकरणाने राऊतांना तुरुंगाची वारी करायला लावली, त्याच प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.या पत्रात त्यांनी राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत.
Uddhav Thackeray- Sanjay Raut
Uddhav Thackeray- Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात बदलापूर येथील चिमुरडींवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं समाजात संतापाची मोठी लाट उसळली होती.या घटनेवरुनच्या आरोप -प्रत्यारोपांनी सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकीय वातावरणही ढवळून काढलं होतं.एवढंच नव्हे तर महाविकास आघाडीला महाराष्ट्र बंदवरुन उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही उद्धव ठाकरे, शरद पवारांसह काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यभरात आंदोलन छेडलं होतं.

एकीकडे हे सर्व सुरू असताना आता शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊतांवर (Sanjay Raut) गंभीर आरोप करत थेट एका महिलेने थेट माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच पत्र लिहिलं आहे.यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणावरुन तब्बल 104 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला होता.त्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या संजय राऊतांनी आपल्या टीकेची धार आणखी टोकदार करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर तुटून पडत आहेत.

मात्र, ज्या पत्राचाळ प्रकरणाने राऊतांना तुरुंगाची वारी करायला लावली, त्याच प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे.या पत्रात त्यांनी राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत.

Uddhav Thackeray- Sanjay Raut
Navi Mumbai : महाविकास आघाडीत राजकारण तापणार? नाना पटोलेंची नवी मुंबईबाबत मोठी मागणी

स्वप्ना पाटकर पत्रात म्हणतात, मी 2016 ते 2021 तुम्हाला अनेक ई-मेल लिहिले. सत्य परिस्थिती कळवली. संजय राऊत कसे माझा पाठलाग करत होते,मला धमकावत होते आणि त्यांच्याशिवाय इतर कोणासोबत काम करू देणार नाही असं म्हणून घाबरवण्याचा प्रयत्न करत होते, हे मी फार स्पष्ट आपल्याला कळवले होते असा आरोप त्यांनी केल्यामुळे राऊतांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

महिला सुरक्षिततेबद्दल तुम्हाला बोलताना ऐकून खूप आनंद झाला. "नराधमांना तर शिक्षा झालीच पाहिजे, पण त्यांना पाठीशी घालणाऱ्यांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांवर दबाव आणला असेल, तर दबावाखाली आलेले पोलिससुद्धा नराधमांएवढेच विकृत आहेत.” असे तुमचे ट्विट वाचून बरं वाटल्याचेही पाटकर ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

पत्राचाळ प्रकरणातील साक्षीदार असलेल्या स्वप्ना पाटकर यांनी पत्रात उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या,माझ्यावर हल्ले झाले, मला वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला संबंध नसताना बोलावले जायचे,माझे काम बंद करण्यात आले, घराबाहेर काढणार असा दबाव टाकला गेला.सगळे माहीत असून तुम्ही काहीच मदत केली नाही. याचे मात्र मला वाईट वाटले असेही पाटकर यांनी पत्रात नमूद केलं आहे.

Uddhav Thackeray- Sanjay Raut
Ajit Pawar: CM कोण होणार? अजित पवार म्हणाले, 'महायुतीचे सरकार आल्यानंतर...'

'...मी वाट पाहत आहे!'

फोनवर शिवीगाळ केली,घर उध्वस्त केले,काम बंद करून जगण्याचे साधन संपवले.हे सगळे माहित असून देखील तुम्ही त्यांना पूर्ण शिवसेना हातात दिली.आणि त्यांनी माझी वाट लावली तशीच पक्षाची वाट लावली. असो. आता तुम्ही बहिणीसाठी लढायला तयार आहात म्हणून विचारते.या बहिणीसाठी तुम्ही काय करणार ते महाराष्ट्राला नक्की सांगा. मी वाट पाहत आहे. तुमची लाडकी बहीण स्वप्ना पाटकर असेही पाटकर पत्राच्या शेवटी म्हणतात.

'2022 ला एक ऑडिओ क्लिप व्हायरल अन्...'

2022 ला एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.त्यात खासदार संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार असलेल्या स्वप्ना पाटकर यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी पाटकर यांनी राऊतांविरोधात आक्रमक भूमिका घेत एफआयआर देखील नोंदवला होता.त्यावेळी पत्राचाळ प्रकरणानंतर राऊतांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा संजय राऊतांवर गंभीर आरोप झाल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray- Sanjay Raut
Aditya Thackeray News : आमचे आंदोलन महिला अत्याचाराच्या विकृती विरोधात, तर भाजपचे त्यांच्या बाजूने..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com