Aditya Thackeray News : आमचे आंदोलन महिला अत्याचाराच्या विकृती विरोधात, तर भाजपचे त्यांच्या बाजूने..

Aditya Thackeray was angry at BJP's agitation : बदलापूरच्या घटनेनंतर एका महिला पत्रकाराला `तुझ्यावर रेप झाल्यासारखे तू का विचारत आहेस`? असा प्रश्‍न करणे हा गुन्हा असला पाहिजे. असा प्रश्‍न करणारे वामन म्हात्रे कोण आहेत ? त्यांना, शीतल म्हात्रे यांना पक्षातून का काढले नाही ?
Aditya Thackeray News
Aditya Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena-BJP Political News : महाविकास आघाडीतर्फे महिला अत्याचाराच्या घटनांसंदर्भात महिलांना न्याय मागण्यासाठी आणि विकृतीच्या विरोधात आंदोलन केले जात आहे, पण भाजप विकृतीच्या बाजूने आंदोलन करत आहे, अशा शब्दात हाॅटेलबाहेर आंदोलन करणाऱ्या भाजपला सुनावले. महिला पत्रकाराचा अपमान करणाऱ्या वामन म्हात्रे, शीतल म्हात्रे यांची अद्याप पक्षातून हकालपट्टी का केली नाही ? असा प्रश्‍न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आदित्य ठाकरे यांनी केला.

शिवसेना ठाकरे गट व भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आपली भूमिका मांडली. महाविकास विकास आघाडीचे सरकार असताना आम्ही शक्ती कायदा आणला होता, तो केंद्राकडे पाठविला. पुढे त्याचे काय झाले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सत्ता आहे. त्यामुळे महिला अत्याचाराच्या विरोधात जाब विचारण्यासाठी आम्ही काल आंदोलन केले.

गेल्या दोन वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. बदलापूरच्या घटनेनंतर एका महिला पत्रकाराला `तुझ्यावर रेप झाल्यासारखे तू का विचारत आहेस`? असा प्रश्‍न करणे हा गुन्हा असला पाहिजे. असा प्रश्‍न करणारे वामन म्हात्रे कोण आहेत ? त्यांना, शीतल म्हात्रे यांना पक्षातून का काढले नाही ? या घटनेनंतर झालेले आंदोलन राजकीय होते, असे घटनाबाह्य मुख्यमंत्री निर्लज्जपणाने म्हणतात.

Aditya Thackeray News
Aditya Thackeray News : पैठणमध्ये आदित्य ठाकरेंना मराठा आंदोलकांनी रोखले..

नागरिक रस्त्यावर येऊन आंदोलन करतात, त्याला तुम्ही राजकीय म्हणता ? अत्याचाराची तक्रार घेण्यासाठी तुम्हाला सहा दिवस लागले. गरोदर महिलेला दहा तास बसवून ठेवले. (Shivsena) आम्ही पुकारलेला बंद न्यायालयाच्या निर्णयानंतर मागे घेतला. तो राजकीय नव्हता, कोण्या पक्षाच्या विरोधात नव्हता, तर महिला अत्याचाराच्या विरोधात होता, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केले तर भाजपने विकृतीच्या बाजून आंदोलन केले हा फरक असल्याचे ठाकरे म्हणाले. दिशा सालियन प्रकरणावरून होत असलेल्या आरोपावर असे राजकीय विषय येत राहतील. त्यांना जे लोक घाबरतात, त्यांची बदनामी करणे, त्यांना घाबरविण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray News
Shivsena-BJP News : मोदींविरोधातील आंदोलनाचा राग भाजपने काढलाच..

भाजपच्या कार्यकर्त्यांना रोखणाऱ्या शिवसैनिकांवर पोलिसांनी लाठ्या चालवल्या, याकडे लक्ष वेधले असता सत्ता त्यांच्या हातात आहे. त्यामुळे विरोधात आंदोलने सुरू असताना लाठीचार्जचे आदेश पोलिसांना दिले जातात, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. जरांगे पाटील यांच्यासह आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला ? सीएम की दोन डीसीएम ? यांच्यातील खरा डायर कोण ? असा प्रश्‍न आदित्य ठाकरे यांनी या निमित्ताने केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com