ZP committee election Uday Samant unopposed decision sarkarnama
कोकण

ZP Election : ZP त ठाकरेंचा शिलेदार बांधकाम व कृषी समितीवर; उदय सामंतांनी निवडणूक बिनविरोध केली

Ratnagiri ZP committee election: रत्नागिरी जिल्हा परिषद विषय समित्या सदस्य निवडणुकीत बिनविरोध पॅटर्न पहायला मिळाला असून बांधकाम समिती सदस्यपदी विरोधकाची निवड झाली आहे. ज्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Aslam Shanedivan

  1. जिल्हा परिषद विषय समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता होती, पण विरोधकांनी अर्ज दाखल केल्याने चुरस निर्माण झाली होती.

  2. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्तक्षेपामुळे विरोधकांनी अर्ज मागे घेतले.

  3. परिणामी सर्व समित्यांची निवड बिनविरोध झाली आणि विरोधकांना बांधकाम समिती सदस्यपद देण्यात आले.

Ratnagiri News : जिल्हा परिषद विषय समित्या सदस्य निवड निवडणुकीत विरोधी सदस्यांनी काही समित्यांमध्ये अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार की रंगणार, अशी स्थिती होती; मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या शिष्टाईने विरोधी सदस्यांनी अर्ज मागे घेतल्याने समित्यांची निवड बिनविरोध झाली. या बदल्यात विरोधकांच्या पदरात बांधकाम समिती सदस्यपद पडले. राष्ट्रवादीच्या सदस्यांना एक समिती बदलून दिली.

विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया झाल्यानंतर सदस्यपदांची निवड प्रक्रिया झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड झाली. स्थायी, जलव्यवस्थापन, वित्त, शिक्षण, बांधकाम, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, महिला व बालकल्याणसाठी सदस्य निवडले.

स्थायी, जलव्यवस्थापन, बांधकाम, समाजकल्याण या समितीच्या सदस्यपदासाठी विरोधकांनी अर्ज दाखल केले होते. यावेळी विरोधकांच्या अर्जांसह समितीच्या सदस्यपदांसाठी असलेले अन्य अर्जही वैध ठरले होते.

याच कालावधीत शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी विरोधी सदस्य विक्रांत जाधव, संतोष थेराडे, नेहा माने, प्रमोद निवळकर, प्रमोद गांधी यांच्यासह कुवळेकर यांच्याशी चर्चा केली. पालकमंत्री उदय सामंत यांनी विक्रांत जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

त्यामुळे जाधव यांनी ज्येष्ठ नेते सामंत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला विरोधी पक्षाचे सदस्य स्थायी समितीसाठी हटून बसले होते. मात्र त्यानंतर बांधकाम समिती देण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतल्यानंतर भरलेले अर्ज मागे घेतले. ठाकरे गटाच्या प्रमोद निवळकर यांना बांधकाम व कृषी समितीवर सदस्य म्हणून घेण्यात आले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी अजय बिरवटकर यांनीही जाहीर झालेल्या सदस्यत्वाबाबत नाराजी व्यक्त करत मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांना मिळालेली आरोग्य समिती बदलून त्यांना बांधकाम व कृषी समितीवर घेतले. त्यानंतर समिती सदस्य निवड सभा झाली व अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी सर्व समित्यांच्या सदस्यांची नावे जाहीर केली.

समिती सदस्यांची नावे

स्थायी : ऐश्वर्या धाडवे, अरुण कदम, शिवानी सावंत, महेश म्हाप, महेंद्र झापडेकर, प्रमोद अधटराव, संतोष रेवाळे, रमेश सूद.

जलव्यवस्थापन : किशोर देसाई, सचिन धाडवे, नेत्रा ठाकूर, हर्षदा गावडे, प्रतीक मटकर.

वित्त : प्रताप घोसाळकर, मीनाक्षी शेडगे, आदिती खाडे, विनया झगडे, प्रमोद गांधी, अरुण कदम, प्रतीक मटकर, प्रणव पोळेकर.

शिक्षण : प्रभाकर गोलांबडे, मानसी जगदाळे, रेवती पाटील, दीप्ती महाडिक, नेहा रहाटे, विशाखा कुळेकर, मनीषा लाखण, सोनाली टुकरूल.

बांधकाम : प्रताप घोसाळकर, अजय बिरवटकर, रावी मोरे, विनया झगडे, राजेश साळवी, महेंद्र झापडेकर, कोमल नवाळे, प्रमोद निवळकर.

आरोग्य : साधना महाजन, जाई आंब्रे, पूजा निकम, संतोष थेराडे, विक्रांत जाधव, ॲड. महेंद्र मांडवकर, मनीषा लाखण, विनिता गांगण.

कृषी : प्रमोद निवळकर, प्रणाली चिले, उन्मेष राजे, आफिया पालेकर, सूर्यकांत खेतले, प्रवीण पांचाळ, शर्वरी वेल्ये, मानसी आंबेकर, नंदिनी कदम, अजय बिरवटकर.

पशुसंवर्धन : मीनाक्षी शेडगे, आदिती खाडे, पूजा निकम, अपूर्वा बारगोडे, नेत्रा ठाकूर, सुशील भायजे, माधवी गीते, प्रकाश कुवळेकर.

समाजकल्याण : नितीन दुर्गवले, ऐश्वर्या धाडवे, संजय कदम, उषा सावंत, हर्षदा गावडे, प्रकाश रसाळ, ॲड. महेंद्र मांडवकर, सिद्धाली मोरे.

महिला व बालकल्याण : प्रभाकर गोलांबडे, अपूर्वा बारगोडे, उषा सावंत, राजेश साळवी, माधवी गीते, नेहा माने, लीला घडशी, सोनाली टुकरूल.

FAQs :

1. समिती निवडणुका बिनविरोध कशा झाल्या?
उदय सामंत यांच्या मध्यस्थीने विरोधकांनी अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणुका बिनविरोध झाल्या.

2. विरोधकांनी अर्ज का मागे घेतले?
राजकीय समन्वय आणि पदवाटपाच्या करारामुळे विरोधकांनी माघार घेतली.

3. विरोधकांना कोणते पद मिळाले?
विरोधकांच्या पदरात बांधकाम समिती सदस्यपद पडले.

4. राष्ट्रवादीच्या सदस्यांना काय बदल मिळाला?
राष्ट्रवादीच्या सदस्यांना एक समिती बदलून देण्यात आली.

5. या घटनेचा राजकारणावर काय परिणाम होईल?
स्थानिक राजकारणात तडजोडीचे राजकारण वाढण्याची शक्यता असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये समन्वय दिसून येतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT