ZP Politics : स्वीकृतसाठी स्पर्धा वाढली, राजकीय हालचालींना वेग; नियमावली आणि निर्णयानंतरच मिळणार 'ZP'त प्रवेश

ZP Nominated Members Politics : नगरपालिका, महानगर पालिकेप्रमाणेच आता पंचायत समिती व जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य नियुक्ती होणार आहे. यामुळे राज्यभर आता इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जातेय.
kolhapur zp
kolhapur zpSarkarnama
Published on
Updated on
Summary
  • सांगली बाजार समितीचे त्रिभाजन करून स्वतंत्र समित्या स्थापन करण्याचा निर्णय

  • जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान संचालक मंडळ बरखास्त

  • प्रशासक नेमण्यामुळे स्थानिक राजकारणात मोठा बदल

कोल्हापूर : सुनील पाटील

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी स्वतंत्र नियमावली तयारी केली जाणार आहे. ही नियमावली दोन दिवसांत तयार होणार असून, त्यानंतर शासन निर्णय जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे, स्वीकृत सदस्य म्हणून जिल्हा परिषद सभागृहात जाण्यासाठी अनेकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

जिल्हा परिषदेत १९९२ पर्यंत स्वीकृत सदस्य घेण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर स्वीकृत सदस्य घेणे बंद झाले होते. दरम्यान, ही प्रक्रिया नव्याने सुरू करण्यासाठी शासनाच्या पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, हे सदस्य घेत असताना विविध प्रकारचे नियम आणि निकष तयार केले जाणार आहेत.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्हा परिषद अधिनियमात दुरुस्ती केली आहे. मात्र, स्वीकृत सदस्य कधी घेणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेत १० सदस्यांमागे एक व पंचायत समितीमध्ये पाच सदस्यांमागे एक असे स्वीकृत सदस्य घेतले जाणार आहेत.

kolhapur zp
ZP Politics : 'मलाईदार' खात्यासाठी भाजपने फिल्डिंग लावली मात्र राष्ट्रवादीने बाजी मारली; बड्या नेत्याची खेळी निष्फळ

दरम्यान, हे सदस्य घेत असतानाही त्यांना नियम व अटींवर घेतले जाणार आहेत. नियम व अटी काय असणार हे शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर समजणार आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्य घेण्यात वेळ लागत आहे. नियमावली तयार झाल्यानंतर तत्काळ शासन निर्णय जाहीर करुन स्वीकृत सदस्य घेतले जातील.

ग्रामविकास विभागाने नियमावली तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या दोन दिवसात हा निर्णय होणार आहे. राज्यातील ११ जिल्हा परिषद आणि १२५ पचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य घेतले जाणार आहेत. या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, रायगड, परभणी आणि धाराशिव आदी ११ जिल्हा परिषदांमध्ये स्वीकृत सदस्य घेतले जाणार आहेत.

kolhapur zp
ZP Politics : एका मताच्या विजयाने थेट अर्थ व बांधकाम सभापती पदाला गवसणी; भाजप सदस्याची लॉटरी लागली!

‘जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यांचा निर्णय झाला आहे. यामध्ये नियम व अटी असणार आहेत. दोन दिवसांत हे नियम तयार केले जातील. त्यानंतर स्वीकृतबाबत शासन निर्णय जाहीर केला जाईल.

जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री

FAQs :

1. सांगली बाजार समितीचे त्रिभाजन का करण्यात आले?
प्रशासन सुलभ करण्यासाठी आणि स्वतंत्र कारभारासाठी हा निर्णय घेण्यात आला

2. याचा कोणावर राजकीय परिणाम झाला?
जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर याचा परिणाम झाला आहे

3. समितीचे पुढे काय होणार?
प्रशासक नेमून समितीचा कारभार चालवला जाणार आहे

4. कोणत्या भागांसाठी स्वतंत्र समित्या स्थापन झाल्या?
कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांसाठी स्वतंत्र समित्या

5. या निर्णयावर कोणाची प्रतिक्रिया चर्चेत आहे?
गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिक्रियेची चर्चा सुरू आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com