Mumbai News : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे राज्यात मोठा वादंग निर्माण झाला आहे. यामुळे कामरा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. सध्याजरी त्याला मद्रास न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिलं असलं तरी, पोलिसांकडून तिसरं समन्स कामराला बजावण्यात आलं आहे. याचदरम्यान,कुणाल कामरानं (Kunal Kamra) सोशल मीडियावर एक पोस्ट करत माफी मागितली आहे. पण ही माफी त्यानं एकनाथ शिंदेंची मागितलीच नाही,याउलट शिवसैनिकांनाच डिवचलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध कामरा असा वाद तापण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलिसांकडून कुणाल कामराला एकापाठोपाठ एक अशी समन्सवर समन्स पाठवली जात आहेत. पण, तामिळनाडूतील त्याच्या घरापर्यंत पोहोचलेल्या पोलिसांना कामरा काय हाती लागला नाही. एकीकडे तो चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचं नाव घेत नसताना कामरा सोशल मीडियावर मात्र पोस्टवर पोस्ट टाकत असून प्रचंड अॅक्टिव्ह असल्याचंही दिसून येत आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंवरच (Eknath Shinde) टीका केल्यानं आक्रमक शिवसैनिकांनी स्टुडिओ तर फोडलाच शिवाय कुणाल कामरावर माफी मागण्यासाठी मोठा दबावही आणला आहे. याचवेळी आता कुणाल कामरानं आपल्या एका पोस्टमध्ये जाहीर माफी मागितल्याची माहिती समोर येत आहे.
सध्यातरी झुकेगा नही या भूमिकेत असलेल्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं थेट त्याच्या अकाउंटवरुन माफीची पोस्ट केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हे ट्विट त्यानं बुधवारी (ता.2) केलं आहे. त्याच्या या ट्विटमध्ये माझा शो अटेंड केल्यानंतर तुम्हाला झालेल्या कोणत्याही गैरसोयीबद्दल मी माफी मागतो, असं त्यानं म्हटलं आहे.
याचवेळी कामरानं कृपया मला मेल करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी व्हेकेशन प्लॅन करू शकेल. देशभरात तुम्हाला जिथे कुठेही फिरायचं असेल तिथे... असं म्हणत शिवसैनिकांच्या जखमेवर एकप्रकारे मीठच चोळलं आहे. त्यानं एकनाथ शिंदेंची माफी न मागता चाहत्यांची माफी मागितली आहे. एकप्रकारे असं ट्विट करत कामरानं थेट शिवसैनिकांनाच डिवचलं आहे.
मुंबई पोलिसांकडून एकीकडे कुणाल कामराची चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे शो दरम्यान उपस्थित असलेल्या प्रेक्षकही अडचणीत आले आहेत. कारण मुंबई पोलिसांनी अलिकडेच उपस्थित प्रेक्षकांना नोटीस बजावली आहे. कुणालच्या प्रेक्षकांमध्ये मुंबईचा एक बँकरही होता.हा बँकर अलिकडेच तामिळनाडू आणि केरळला फिरायला जाणार होता.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा एकनाथ शिंदेवरील उपहासात्मक गाण्यामुळे चांगलाच वादात सापडला आहे. या प्रकरणात त्याचे प्रेक्षकही आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मुंबई पोलिसांनी कामराच्या प्रेक्षकांना कलम 179 अंतर्गत नोटीस बजावली आहे. यामध्ये मुंबईतील एक बँकरही आहे. हा बँकर व्हेकेशनसाठी राज्याबाहेर होता.पण,पोलिसांनी पाठवलेलं समन्स मिळताक्षणी हा बँकर तातडीनं ट्रिप सोडून मुंबईत दाखल झाला आहे. त्याचीच कामरानं माफी मागितली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.