Ajit Pawar On Beed Crime: अखेर अजितदादांचा एकच इशारा अन् बीडच्या गँगला घामच फुटला, थेट टायरची थर्ड डिग्री....

Ajit Pawar Beed Visit : चुकीचं काम करणारा कितीही मोठया बापाचा असला तरी त्याला सोडणार नाही. आमचं पोलीस खाते गप्प बसणार नाही, असा इशाराही उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी यावेळी दिला.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता. या घटनेनंतर एकापाठोपाठ एक अशा गुन्हेगारी घटनांनी बीड जिल्ह्याचं नाव देशपातळीवर पोहोचलं. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तापल्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री कडक शिस्तीच्या अजित पवारांनीच (Ajit Pawar) बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वत:कडे घेतली. यानंतर एकामागोमाग एक असे धडाकेबाज आणि तितकेच कठोर निर्णय घेत त्यांनी बीडमधील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना नियंत्रणात आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार हे बुधवारी (ता.2 एप्रिल) बीड दौऱ्यावर आहेत.यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवरही आपल्या नेहमीच्या शैलीत भाष्य केले. याचवेळी त्यांनी बीडच्या सर्वच गँगला सक्त ताकीद दिली आहे. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यात राख,वाळू, भूमाफिया या गँग वाढल्या आहेत. पण या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करायचं आहे.त्याला आता पर्याय नाही. या त्यांच्या वक्तव्यामुळे अजितदादांच्या दादागिरीचा रोख नेमका कोणाकडे होता?अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

अजित पवार म्हणाले,बीड जिल्ह्यात मागच्या तुलनेत आता कामाचा स्पीड वाढला आहे. मात्र, रस्ते मंजूर करून नुसती बिलं काढेल त्याला मी नाही मातीत घातला तर बोला, असा थेट आता इशाराच जिल्ह्यातील सर्वच ठेकेदारांना दिला आहे. तसेच जिल्ह्यातील विविध विकासकामांना निधी देणार आहेच, शिवाय स्कॉड पाठवून या कामांची पाहणी सुद्धा करणार आहे.त्यात चुकीचं काम करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाणार असल्याचा दमही त्यांनी भरला आहे.

Ajit Pawar
BJP New National President : भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? पीएम मोदी, शहांसोबतच 'या' तिसऱ्या बड्या नेत्याची भूमिका असणार महत्त्वाची

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे हे महाराष्ट्र सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभाग सांभाळत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या कित्येक दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला किंवा बैठकीला दिसलेले नाहीत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता धनंजय मुंडे नेमके कुठे आहेत याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

मी कामाचा माणूस आहे.फालतू गप्पा मारायला,टाईमपास करायला मला आवडत नाही.मध्यंतरी काही घटना घडल्या,त्यातून बीडची बदनामी झाली.अशा घटना परत घडू देऊ नका.वेळ पडला तर त्याच्यावर मकोका किंवा इतर कारवाई केली जाईल. तसेच पोलिसांनाही सांगेल,याला टायरमध्ये घ्या, यांसारख्या कडक शब्दांत अजित पवार यांनी सुनावलं.

Ajit Pawar
Sonia Gandhi On Women Reservation : काँग्रेसचा 'महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा; 'हे राजीव गांधींचे स्वप्न...'

चुकीचं काम करणारा कितीही मोठया बापाचा असला तरी त्याला सोडणार नाही. आमचं पोलीस खाते गप्प बसणार नाही. धनंजय मुंडे आज गैरहजर असून याबाबत त्यांनी मला कॉल करून सांगितले आहे. माझी तब्येत बरी नाही.मी दवाखान्यात दाखल होतो आहे. त्यामुळे येत नाही, असा मेसेज धनंजय मुंडेंनी आपल्याला दिल्याची माहितीही अजित पवारांनी यावेळी दिली.

कोठेही गेल्यावर स्थानिक नेते,कार्यकर्ते वगैरे भेटायला येतात.ते मला भला मोठा हार आणतात. तो इतका मोठा हार असतो,तो पाहून मला तेवढीच भीतीही वाटते. तो हार पाहून असं वाटतं की, आयला याने कुठे तरी मारली, आता ती कुठं मारली, काय मारली ते पाहा तुम्ही.त्यामुळे हाराचा बोझा आहे मानगुटीवर,अशी मिश्किल टिप्पणीही अजित पवारांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com