Shivsena News : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील महायुती आणि केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली. राज्यातील विधिमंडळाच्या अधिवेशानाने काय दिले? यावर देशाला एक छान गाणं दिलं, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला. यावर शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट यांनी पलटवार करताना या निमित्ताने उद्धव ठाकरे यांचे मनोरंजन झाले हे ही काही कमी नाही, असा टोला लगावला.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संपले. या अधिवेशनामध्ये जनतेच्या विषयांपेक्षा धार्मिक आणि जातीयवादाचे मुद्देच अधिक गाजले. यावरून महाविकास आघाडी विशेषतः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने सरकारवर टीकेची झोड उठवली. दिशा सालियन प्रकरण पुन्हा उकरून काढल्याबद्दल काल ते हरामखोर आहेत, असे संताप व्यक्त केला होता. अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीकेचा भडिमार केला. त्याला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिउत्तर दिले.
खरतंर विरोधी पक्षाला विधिमंडळात जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडून ते सोडवून घेण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याची चांगली संधी होती. (Sanjay Shirsat) अर्थसंकल्पावर सखोल चर्चा करून सरकार कुठे चुकले? हे सांगण्याची त्याची चिरफाड करण्याची संधीही विरोधकांनी गमावली. ते नागपूरची दंगल, औरंगजेब या विषयात अडकून पडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर शेवटी तेलंगणात कोणाच्या घरी सापडला, हे पटोले यांनी सांगितले पाहिजे होते.
पण जनतेच्या प्रश्नांची जाण, अभ्यास नसलेल्या विरोधकांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार? कुणाल कामराच्या गाण्यावर या अधिवेशनाने देशाला नवे गाणं दिलं म्हणणार्या उद्धव ठाकरे यांचे या निमित्ताने मनोरंजन झाले याचे आम्हाला समाधान आहे. राहिला प्रश्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरण्यावरून त्यांनी केलेल्या विधानाचा, तर बाळासाहेब ठाकरे हे मोठे नेते होते, त्यांच्यावर कोण्या एका कुटुंबाचा किवा पक्षाचा अधिकार नाही.
सगळ्या राजकीय पक्षात बाळासाहेबांना मानणारे लोक होते, त्यामुळे त्यांचा फोटो वापरण्याचा अधिकार त्या प्रत्येकाला आहे, असेही शिरसाट यांनी ठणकावून सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादामुळेच राजकारणात आम्ही जे काही आहोत, ते मिळाले आहे. तुम्हालाही आज जे वैभव दिसते आहे, ते बाळासाहेबांच्या आशिर्वादामुळेच नाहीतर तुमची किमंत शून्य आहे, अशी टीकाही संजय शिरसाट यांनी केली.
खरी शिवसेना आमची आहे, निवडणूक आयोगाने आणि सुप्रीम कोर्टानेही याला दुजोरा दिला आहे. लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका आम्ही त्याच पक्ष, चिन्ह आणि नावावर लढलो. त्यामुळे शिवसेना आमची आहे, गट त्यांचा म्हणजे उद्धव ठाकरे यांचा आहे, असा टोलाही शिरसाट यांनी यावेळी लगावला. दिशा सालियन प्रकरणाची चौकशी होऊन त्यात जे दोषी असतील त्यांना शिक्षा होईलच, असेही त्यांनी स्पष्ट केले.
५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.