Sanjay Shirsat On Aurangzeb News : औरंगजेबाच्या कबरीवर यापुढे सरकारकडून एक रुपयाही खर्च होता कामा नये! ती उखडूनच टाकली पाहिजे..

Sanjay Shirsat has demanded that the government should not spend any money on the maintenance of Aurangzeb's tomb. : क्रूर औरंगजेबची कबर आणि त्याच्या आठवणी अजिबात नको, ती तातडीने उखडून फेकली पाहिजे, ही आमची भूमिका.
Sanjay Shirsat On Aurangzeb News
Sanjay Shirsat On Aurangzeb NewsSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena News : औरंगजेबची कबर उखडूनच टाकली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्या कबरीच्या संरक्षण आणि संवर्धनावर केंद्र सरकार जो काही चार-पाच लाखांचा खर्च करते तो बंद केला पाहिजे. यापुढे औरंगजेबाच्या कबरीसाठी सरकारकडून एक रुपयाही खर्च होता कामा नये, उलट ती कबर उखडूनच टाकली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मांडली.

औरंगजेबच्या कबरीशिवाय शिवाजी महाराजांचा इतिहास कळणार नाही, असे म्हटले तर मग त्याचे पुतळे उभारावे लागतील, असा टोलाही शिरसाट यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलेल्या विधानावर लगावला. विरोधकांना सध्या औरंगजेब याच्याबद्दल भलतेच प्रेम वाटू लागले आहे. केवळ मुस्लिमांची मते आपल्याला मिळावी, यासाठी हा त्यांचा खटाटोप सुरू आहे, असा आरोप शिरसाट यांनी केला.

औरंगजेब याची खुलताबाद येथील कबर उखडून फेकण्यासाठी बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसह विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (Sanjay Shirsat) या पार्श्वभूमीवर औरंगजेब कबरीच्या भोवती मोठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजपाचे खासदार, मंत्री, आमदार औरंगजेबची कबर उखडून फेका यावर भाष्य करताना दिसत आहे. आमची देखील तीच इच्छा आहे, पण या गोष्टी कायद्याने कराव्या लागतील असे, फडणवीस यांनी म्हटले होते.

Sanjay Shirsat On Aurangzeb News
Ambadas Danve On Aurangzeb News : बाबरी पाडताना 'ते आमचे लोक नाही' म्हणणारेच औरंगजेबाच्या नावाने अराजकता पसरवत आहेत!

या सगळ्या प्रकारावरून राज्यातील वातावरण तापले असताना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा या विषयावर आपले मत मांडले. औरंगजेब हा एक क्रूर राजा होता, त्याने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला, त्यांना हाल करून ठार मारले. हिंदूंची मंदिर पाडली, महिलांवर अत्याचार केले. अशा क्रूर औरंगजेबची कबर आणि त्याच्या आठवणी अजिबात नको, ती तातडीने उखडून फेकली पाहिजे, ही आमची भूमिका असल्याचे शिरसाट म्हणाले.

Sanjay Shirsat On Aurangzeb News
Aurangzeb Tomb : 'आम्हाला औरंगजेबाची कबर हटवायची आहे. पण,...' फडणवीसांचे संकेत अन् काँग्रेसवर गंभीर आरोप

सरकार म्हणून औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणे, तिथे पुरेसा पोलीस बंदोबस्त लावणे हे आमचे काम आहे. पण त्यापेक्षाही जनभावना महत्वाच्या आहेत. अयोध्येत बाबरी मशिद पाडली तेव्हाही सरकारने मशिदीला संरक्षण दिले होतेच. पण जनतेच्या उद्रेकापुढे कोणाची काही चालले नाही आणि ती मशिद पाडली गेली. औरंगजेबची कबर नको हीच सध्याची जनभावना आहे. ती ओळखून कबर हटवली पाहिजे, याचा पुनरुच्चार शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केला.

Sanjay Shirsat On Aurangzeb News
Shivsena UBT : मुंबईत 'ते' बिल्डर मटण खाणाऱ्या हिंदूंना घरं नाकारतात; त्यावर 'मटण'वाले 'बाल हिंदुहृदयसम्राट' बोलणार का? ठाकरे गटाने राणेंना डिवचलं

देशात कुठलेही विभाजन नाही..

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देश विभाजनाच्या वाटेवर असल्याचा आरोप केला. याकडे लक्ष वेधले असता, शिरसाट म्हणाले, संजय राऊत हे खूप विद्वान आहेत. पण त्यांना वाटते तसे कुठलेही विभाजन होणार नाही, त्यांनी जनतेची दिशाभूल करु नये. कोणीही मुस्लिमांच्या, त्यांच्या धार्मिक परंपरेच्या आड येत नाही. जे इथे राहतात आणि गुण पाकिस्तानचे गातात त्यांना आमचा विरोध आहे. ही आमची भूमिका आजही कायम आहे. एखाद्याने इफ्तार पार्टी आयोजित केली आणि त्याला कोणी गेला किंवा नाही गेला तर तो मुस्लिम विरोधी किंवा समर्थक ठरत नाही, असेही शिरसाट म्हणाले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com