Ladki bahin yojana Sarkarnama
महाराष्ट्र

Ladki bahin yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! 8 दिवसात सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत; एकाचवेळी जमा होणार 4500 रुपये?

Ladki bahin yojana latest news : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी. राज्य सरकार पुढील 8 दिवसांत महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असून एकाचवेळी 4500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

Rashmi Mane

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या हप्त्यांबाबत आता सरकारकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लाखो महिलांना एकाचवेळी आर्थिक मदत मिळणार असल्याने उत्सुकता वाढली आहे.

माहितीनुसार, योजनेअंतर्गत मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांचे हप्ते एकत्र जमा करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात थेट 4500 रुपये जमा होऊ शकतात. याआधी रखडलेल्या निधीमुळे अनेक महिलांमध्ये नाराजी होती. मात्र आता प्रशासनाने प्रक्रिया वेगाने सुरू केल्याने महिलांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

सध्या लाभार्थ्यांची कागदपत्रे आणि बँक खात्यांची तांत्रिक पडताळणी केली जात आहे. विशेषतः ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांची माहिती तपासली जात असून, पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. पडताळणी पूर्ण होताच पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

16 मे रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेतल्यानंतर निधी वितरणाचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे पुढील काही दिवसांत महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा होण्याची शक्यता वाढली आहे.

दरम्यान, सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली आहे. ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही किंवा माहितीमध्ये दुरुस्ती केलेली नाही, त्यांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. काहींचा लाभ थांबवण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पात्र महिलांनी लवकरात लवकर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT