Tamil Nadu Govt Formation TVK : थलापती विजय यांच्या राजकारणाचे 'रिमोट कंट्रोल' 'या' व्यक्तीकडे! एका निर्णयामुळे TVK चा गेम होणार ओव्हर?

Thalapathy Vijay political strategy : थलापती विजय आणि TVK पक्षाबाबत मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. एका महत्त्वाच्या निर्णयानंतर पक्षाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाचा सविस्तर विश्लेषण.
Thalapathy Vijay political strategy
Thalapathy Vijay political strategy Sarkarnama
Published on
Updated on

तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू असून अभिनेता-राजकारणी थलापती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाभोवती सगळे राजकीय समीकरण फिरताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत TVK सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला, तरी बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा गाठण्यात पक्ष अपयशी ठरला. त्यामुळे आता विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर अनिश्चिततेचे सावट आले आहे.

तमिळनाडू विधानसभेच्या 234 जागांपैकी TVK ला 108 जागा मिळाल्या. बहुमतासाठी 118 आमदारांची गरज आहे. काँग्रेसने TVK ला पाठिंबा जाहीर केला असला, तरी दोन्ही पक्षांची एकत्रित संख्या 113 पर्यंतच पोहोचते. त्यात विजय यांनी दोन मतदारसंघांतून विजय मिळवल्याने त्यांना एक जागा सोडावी लागणार आहे. त्यामुळे आघाडीची ताकद आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

Thalapathy Vijay political strategy
Tamil Nadu crisis : विजय यांना पाठिंब्यासाठी आग्रह धरणाऱ्या AIADMK खासदाराचा तडकाफडकी राजीनामा; सुमारे 25 आमदारांचे आहे समर्थन

याच परिस्थितीचा फायदा घेत आता एम. के. स्टॅलिन यांच्या DMK पक्षाने नवीन राजकीय डाव टाकल्याची चर्चा रंगली आहे. विजय यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK आणि AIADMK हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली करत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे AIADMK कडून DMK ला बाहेरून समर्थन किंवा युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, तमिळनाडूच्या सध्याच्या राजकारणाचे “रिमोट कंट्रोल” आता स्टॅलिन यांच्या हातात गेले आहे. कारण अंतिम निर्णय DMK घेणार असून, त्यावरच राज्यातील सत्तेचे भवितव्य ठरणार आहे. स्टॅलिन जर AIADMK सोबत जाण्याचा निर्णय घेतात, तर सर्वात मोठा पक्ष असूनही TVK विरोधी बाकांवर बसण्याची वेळ येऊ शकते.

दरम्यान, छोटे पक्षही आता किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. CPI, CPI(M) आणि VCK या पक्षांकडे प्रत्येकी दोन आमदार आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी त्यांचा पाठिंबा निर्णायक मानला जात आहे. TVK आणि AIADMK या दोन्ही गटांकडून या पक्षांशी संपर्क वाढवण्यात आला आहे.

राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की AIADMK ने भाजपशी असलेले संबंध कमी केले, तर DMK त्यांच्या प्रस्तावाचा गंभीरपणे विचार करू शकते. त्यामुळे तमिळनाडूत कधीही नवे राजकीय समीकरण तयार होऊ शकते.

Thalapathy Vijay political strategy
SSC Result 2026 : दहावीचा निकाल जाहीर, राज्यातील 92.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; 'या' अधिकृत वेबसाईटवर चेक करा तुमचा स्कोअरकार्ड!

एकीकडे विजय सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे स्टॅलिन यांच्याकडे संपूर्ण खेळाचे सूत्र असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे “TVK चा गेम ओव्हर होणार का?” हा प्रश्न आता तमिळनाडूच्या राजकारणातील सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com