SSC Result 2026 : दहावीचा निकाल जाहीर, राज्यातील 92.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; 'या' अधिकृत वेबसाईटवर चेक करा तुमचा स्कोअरकार्ड!

Maharashtra SSC Result 2026 online check : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 2026 जाहीर झाला असून राज्यातील 92.09% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अधिकृत वेबसाईटवरून लगेच तुमचा स्कोअरकार्ड ऑनलाइन चेक करा.
Maharashtra Board SSC Result 2026 announced
Maharashtra Board SSC Result 2026 announcedSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Class 10 Result 2026 district wise marks: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला असून राज्यातील विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.

यंदाच्या निकालात राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात 2.01 टक्क्यांनी घट झाली असली तरी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यंदा राज्यभरातून 15 लाख 55 हजार 26 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 42 हजार 472 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 14 लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यंदाही मुलींनी निकालात आघाडी घेत मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे. मुलांचा निकाल 89.56 टक्के लागला, तर मुलींचा निकाल 94.96 टक्के नोंदवला गेला. त्यामुळे मुलींचा निकाल मुलांपेक्षा 5.40 टक्क्यांनी अधिक ठरला आहे.

Maharashtra Board SSC Result 2026 announced
Maharashtra Government News: तुमचं लग्न ठरलयं! पत्रिका छापण्यापूर्वी सरकारचा नवा नियम माहित आहे का?

राज्यातील विभागनिहाय निकालात कोकण विभागाने 97.62 टक्के निकालासह प्रथम क्रमांक पटकावला, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी 88.41 टक्के लागला. पुणे विभागाचा निकाल 94.24 टक्के, मुंबई विभागाचा 94.97 टक्के, नागपूर विभागाचा 89.07 टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.41 टक्के, कोल्हापूर विभागाचा 95.47 टक्के, अमरावती विभागाचा 90.50 टक्के, नाशिक विभागाचा 90.53 टक्के, लातूर विभागाचा 88.42 टक्के आणि कोकण विभागाचा 97.62 टक्के लागला.

10 वीच्या परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येईल.

1) https://results.digilocker.gov.in

2) https://mahahsscboard.in

3) https://sscresult.mkcl.org

4) https://results.targetpublications.org

5) https://results.navneet.com

Maharashtra Board SSC Result 2026 announced
Nida Khan Arrest : निदा खानला संभाजीनगरमधून अटक केल्याने राजकारण तापलं ; ‘खरे सूत्रधार इम्तियाज जलील’ शिवसेना मंत्र्याचा गंभीर आरोप

विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल विविध अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. गुणपत्रिका डाउनलोड करण्यासोबतच प्रिंटआउट काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. डिजिलॉकर अॅपवर डिजिटल गुणपत्रिका सुरक्षित ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच शाळांनाही त्यांच्या लॉगिनद्वारे एकत्रित निकाल पाहता येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com