Mumbai News, 08 Apr : महायुती (Mahayuti) सरकारची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' विविध कारणांमुळे सतत चर्चेत असते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून ते निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकारण या योजनेभोवती फिरत होतं. आजही या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात.
सरकारने निवडणुकीआधी सरसकट महिलांना योजनेचा लाभ दिला आणि सत्ता येताच अर्ज पडताळणी लागू करत बहिणींचा विश्वासघात केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. अशातच आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
ती म्हणजे या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर म्हणजेच 30 एप्रिल रोजी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेचा सण लाडक्या बहिणींसाठी गोड होणार आहे. मात्र, एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की कमी होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कारण सरकारने लागू केलेल्या अर्ज पडताळणीचा फटका आतापर्यंत अनेक बहिणींना बसला आहे. त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा हप्ता मार्च महिन्याचा लाभ मिळालेल्या सर्व महिलांना मिळणार का? याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारनं महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून लागू केली आहे. ही योजना महायुतीसाठी विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. मात्र, निवडणुकीनंतर राज्य सरकारने अनेक महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याच्या तक्रारी आल्यामुळे अर्ज पडताळणी सुरू केल्याचं जाहीर केलं.
त्यानुसार आता अपात्र महिलांना या योजनेचा लाभ देणं बंद करण्यात आलं आहे. महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी जवळपास 11 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.