Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी इकडे हायकोर्टाचा सरकारला दणका अन् तिकडे त्याचे पालकच बेपत्ता

Akshay Shinde Parents Missing : बदलापुरातील अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी नुकतीच मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत कोर्टाने राज्य सरकारला दणका देत या प्रकरणाशी संबंधित 5 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
Akshay Shinde Encounter
Akshay Shinde EncounterSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 08 Apr : बदलापुरातील अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी नुकतीच मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली.

या सुनावणीत कोर्टाने राज्य सरकारला दणका देत या प्रकरणाशी संबंधित 5 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. शिवाय आता या एन्काउंटरची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश देखील मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर आता या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेकडून केला जाणार आहे.

मात्र, एकीकडे कोर्टाने पोलिसांविरोधात (Police) एफआयआर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे अक्षय शिंदेचे पालक मागील दीड महिन्यापासून बेपत्ता असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. शिवाय शिंदेचे कुटुंबीय त्यांची बाजू कोर्टात मांडणाऱ्या वकिलांच्याही संपर्कात नसल्याचं सांगितलं जात आहे.

Akshay Shinde Encounter
Supriya sule : अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'सायलेन्स इज ह्युज पावर'

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर बनावट असून आपल्या मुलाला न्याय मिळावा यासाठी त्याच्या पालकांनी न्यायालयात दाद मागण्यासाठी वकील अमित कटरनवरे यांची नेमणूक केली होती. मात्र, वकील कटरनवरे यांच्या संपर्कात देखील अक्षयचे पालक नसल्याची माहिती समोर आली आहे.

वकील कटरनवरे म्हणाले, "अक्षयच्या पालकांनी केस लढण्यास नकार दिल्यापासून ते माझ्या संपर्कात नाहीत. ते सध्या कुठे आहेत आणि कोणत्या परिस्थितीत आहेत याची आपल्याला कल्पना नाही."

Akshay Shinde Encounter
Uddhav Thackeray: उद्ध्वस्त झालेला कोकणचा गड ठाकरेंसाठी आता अवघड

तर, अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची एसआयटी चौकशी करण्याच्या आदेशानंतर त्याचे पालक अचानक संपर्काबाहेर गेले असून त्यांच्या घराला कुलूप आहे. ते अंबरनाथमध्ये ज्या मावशीकडे रहात होते तेथूनही त्याचे पालक निघून गेल्याची माहिती समोर आल्यामुळे अक्षयचे पालक नक्की कुठे गेले? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com