Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana e-KYC Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : 80 लाख अपात्र लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसी पुन्हा होणार? CM फडणवीसांचे महत्त्वाचे संकेत

Ladki Bahin Yojana May Reopen E KYC Process: राज्य सरकारच्या महत्वकांक्षी लाडकी बहीण योजनेतून तब्बल ८० लाख महिलांना अपात्र केल्यानंतर राज्यात आता संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी यावरून सरकारला धारेवरून धरले आहे.

Aslam Shanedivan

Maharashtra Government Scheme News : राज्यातील तब्बल ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवरून धरले आहे. ज्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी असे का झाले याचे स्पष्टीकरण दिले आहे.

आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. त्यांनी अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना दिलासा देणारी घोषणा करत ई-केवायसीची विंडो पुन्हा ओपन करायला सरकार तयार असल्याचे म्हटले आहे.

यामुळे ज्या महिला आता अपात्र ठरल्या आहेत आणि ज्यांना पुन्हा ई-केवायसी करायची आहे. त्यांना पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी मिळणार आहे. पण आता सरकार -केवायसीची विंडो पुन्हा ओपन करणार का की वेळ मारून नेणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ज्या महिला पात्रतेचे निकष पूर्ण करतील त्यांना योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहील. जवळपास १ कोटी ७० लाख महिलांनी योजनेचे निकष पूर्ण केले असून त्यांना लाभ देत आहोत, जे देशातील कुठल्याही योजनेपेक्षा सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची असल्याचे नमूद केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

तसेच लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना वगळण्यात आल्याच्या चचर्चावर बोलताना या योजनेतून कोणालाही वगळले नाही. पण या योजनेच्या निकषानुसार उत्पन्न, वय आणि इतर गोष्टी ज्या बसत नाहीत त्यांना वगळण्यात आले आहे.

आता यांना सरकार पैसे देणार नाही. याआधी सरकारने स्वयंघोषणेच्या आधारे योजना लागू केली. पैसेही दिले. पण शेवटी हा पैसा जनतेचा आहे. यामुळे त्याचे ऑडिट होते, असे म्हटले आहे.

गेली ९ महिने यावर काम सुरू होते, दोनवेळा केवायसीला मुदत वाढही देण्यात आली. पण काहींना ती करावीशी वाटली नाही. तर जेव्हा विविध डेटाबेस पडताळला ज्यात १४ हजार पुरुष, ५ लाख सरकारी कर्मचारी, १० लाख इन्कमटॅक्स भरणारे सापडले.

तसेच ज्यांच्याकडे गाड्या आहेत असेही ४-५ पाच लाख लोकांनी लाडक्या बहिणीचे पैसे लाटल्याचे आता उघड झाले आहे. यामुळे आता हे सर्व निकषात बसणारे नसून त्यांना पैसे दिले जाणार नाहीत, असेही स्पष्ट फडणवीस यांनी म्हटले आहे.

ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत अशी महत्वाची घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली. मात्र ज्या १४ हजार पुरुषांनी लाडक्या बहिणींचे पैसे घेतले आहेत. त्यांना सोडणार नाही, त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील असाही इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

ई-केवायसीची विंडो ओपन करणार

यावेळी फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यकता भासल्यास पुन्हा एकदा केवायसीचा विंडो ओपन करायला सरकार तयार असल्याची ग्वाही दिली आहे. तर ज्या बहिणींना वाटतं की त्या पात्र आहेत आणि काही कारणांनी केवायसी करायची राहिले आहे, त्यांच्यासाठी केवायसीचा विंडो ओपन करायला तयार आहोत, असे त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT