

Sangli News : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर २०२४ मध्ये सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेतून तब्बल ८१ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. यामुळे महायुती सरकारवर आता टीकेची झोड उठली असून निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र केल्याचे समोर येत आहे. यावरून शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारची ही वृत्ती गरज सरो वैद्य मरो अशी असल्याची जोरदार टीका केली. तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याविरोधात टीका हे या सरकारचे राजकीय, प्रशासकीय आणि अंमलबजावणीतील सामूहिक दारुण अपयश असल्याची टीका केली आहे.
दरम्यान शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी, 'राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे हे द्योतक आहे', असे सांगत ही योजना बंद झाली तर आश्चर्य वाटणार नाही, असे विधान त्यांनी केले आहे. 'लाभार्थींच्या संख्येच्या कपातीवर बोलताना गरज सरो आणि वैद्य मरो अशीच काहीशी गत असल्याचे म्हटले आहे.
२०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचा बोजा सरकारी तिजोरीवर पडू लागल्याने अर्जांची पडताळणी सुरू करत ई-केवायसी बंधनकारक केली होती. यानंतर तब्बल ८१ लाख महिला अपात्र ठरल्या गेल्या आहेत. आता राज्यभर १ कोटी ६६ लाख महिला पात्र ठरल्या आहेत.
यावरून आता सरकारवर जोरदार टीका होत असून जयंत पाटील यांनी देखील जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी, "लोकसभा निवडणुकीत झालेली वाताहत पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना सरसकट लाडकी बहीण योजना सुरू केली. योजनेतंर्गत पैसे वाटण्याचा कार्यक्रम झाला. पण आता याच लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आले आहे. तब्बल ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवल्याने गरज सरो आणि वैद्य मरो अशीच काहीशी गत सरकारची झाली आहे.
तब्बल ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवने हे देशानंतर आता राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे हे द्योतक असून याचा पहिला फटका लाडक्या बहिणींना बसला आहे. राज्याची वित्तिय तुट मोठ्या प्रमाणावर असून जागतिक मंदीने अधिक भर घातली घातल्याचेही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर निशाणा साधत आज ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवले. उद्या आणखी काही लाख महिलांना अपात्र केले जावू शकते. हळूहळू ही योजनाच सरकार गुंडाळेल. यात फार आश्चर्य वाटणार नाही. पण शासनाने या योजनेचे आधीच नियोजन केले असते तर ही वेळ आलीच नसती असेही त्यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.