Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : 'एकाही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही!' हप्ते थांबल्यानंतर अदिती तटकरेंचे मोठे विधान; समोर आली 4 मोठी कारणं

Ladki Bahin Yojana beneficiary verification process : लाडकी बहीण योजनेचे हप्ते थांबल्यानंतर अदिती तटकरे यांनी मोठे स्पष्टीकरण दिले आहे. पात्र महिलांवर अन्याय होणार नसल्याचे सांगत हप्ते रखडण्यामागील 4 प्रमुख कारणे स्पष्ट केली आहेत.
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana latest update
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana latest updateSarkarnama
Published on
Updated on

Four reasons behind Ladki Bahin installment delay: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांबाबत राज्यभरात विविध चर्चा सुरू असताना महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. योजनेतील कोणत्याही पात्र महिलेला अन्याय होऊ दिला जाणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच अर्ज रद्द झाल्याच्या चर्चांमध्ये अनेक गैरसमज पसरल्याचेही त्यांनी सांगितले.

अदिती तटकरे म्हणाल्या की, सुमारे 80 लाख महिलांचे अर्ज थांबले असल्याचा अर्थ ते सर्व अर्ज अपात्र ठरले आहेत असा होत नाही. यातील मोठ्या संख्येने लाभार्थींनी वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती. शासनाने ई-केवायसीसाठी तब्बल 8 ते 10 महिन्यांचा कालावधी दिला होता. मात्र, अनेकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकली नाही.

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana latest update
MLC Election : 'कोणी कोणाला किती 'नोटा' दिल्या हे तरी मोजा!' निवडणूक प्रशिक्षणात 'नोटा'वरून अधिकारी-नगरसेवक आमनेसामने!

याशिवाय अर्जांची पडताळणी करताना काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 11.5 ते 12 लाख अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले. तसेच 4.75 ते 5 लाख महिलांचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले. आरटीओच्या नोंदींनुसार 3.25 लाखांहून अधिक लाभार्थी महिलांच्या नावावर वाहने नोंदणीकृत आहेत.

दरम्यान, जवळपास 14,500 शासकीय कर्मचारी या योजनेचा लाभ घेत असल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणात शासनाने संबंधितांकडून रकमेची वसुली करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मंत्र्यांनी स्पष्ट केले की, ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे किंवा वाहन नसतानाही त्यांचे हप्ते थांबले असतील, त्यांनी तातडीने महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधावा. अशा सर्व प्रकरणांची फेरतपासणी करून पात्र महिलांना पुन्हा लाभ दिला जाईल.

तसेच संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांनाही किमान एका योजनेचा लाभ मिळेल याची सरकार काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana latest update
Chandrakant Patil : "मॅनेज झाल्याचा ठपका नको म्हणून...", सांगली-सातारा विधान परिषदेच्या उमेदवारीवरून चंद्रकांत पाटलांनी 'मविआ'ला डिवचलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रत्येक पात्र लाडक्या बहिणीपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अदिती तटकरे यांनी नमूद केले. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे थकीत हप्ते वितरित करण्याची प्रक्रिया गेल्या आठवड्यापासून सुरू झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com