लाडकी बहीण योजनेत KYC दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख आज आहे.
KYC अपडेट न केल्यास ₹1500 चा लाभ बंद होऊ शकतो.
सुमारे 71 लाख महिला या योजनेतून बाद होण्याची शक्यता आहे.
eKYC Correction Last Date : राज्यातील लाडक्या बहीणींना अत्यंत महत्त्वाची बातमी असून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलेली शेवटची संधीही आज संपणार आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याचा आजचा (३१ मार्च) अंतिम दिवस आहे. यामुळे ज्या लाडक्या बहिणींच्या केवायसीत चुका झाल्या असतील त्यांनी आजच या दुरुस्त करायच्या आहेत. अन्यथा ₹१५०० चा लाभ कायमचा बंद होणार आहे. तसेच जर केवायसीत दुरुस्ती केली नाही तर जवळपास ७१ लाख महिला या योजनेतून बाद होणार आहेत. या योजनेच्या सुरुवातीला २ कोटी ४७ लाख लाभार्थ्यांची संख्या होती. आता या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून असून ती आता १ कोटी ७६ लाखांवर आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्याआधी महायुती सरकारकडून या योजनेची घोषणा तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांच्या बँक खात्यावर दर महा १५०० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जात होते. या योजनेमुळेच पुढे राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली. पण यानंतर या योजनेत मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थी घुसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले.
ज्यानंतर सरकारने ईकेवायसी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर या योजनेचा लाभ केवळ अडीच लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांशिवाय सरकारी महिला कर्मचारी, पुरूष मंडळींनी घेतल्याचे उघड झाले होते. यानंतर आता लाडकी बहीण योजनेत केवायसी अनिवार्य करण्यात आली.
सुरुवातीला ईकेवायसीसाठी ३१ डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आली. त्यावेळी २ कोटी ४७ लाख लाभार्थ्यांपैकी १ कोटी ७० लाखांच्या आसपास महिलांना ईकेवायसी केली. मात्र अनेक महिलांनी कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत आहे किंवा नाही यासाठी देण्यात आलेल्या पर्यायांतून चुकीचा पर्याय निवडला आणि त्यांचा लाभ बंद झाला. अनेक महिलांच्या तक्रारी आणि विरोधकांच्या टीकेनंतर ईकेवायसीच्या दुरुस्तीकरण्यासाठी पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना राज्य सरकारने संधी उपलब्ध करून दिली.
यावेळी सरकारने ईकेवायसीतील दुरुस्तीकरण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली. जी आज मंगळवारी संपत आहे. आता ही शेवटची संधी असून त्यानंतर कोणतीही नवीन मुदत देण्यात येणार नाही. तसेच आता केवायसी करण्यासाठी अवघे काही तास उरले असून ज्या महिलांनी ईकेवायसीत दुरुस्ती केलेली नाही त्यांना लगेच ती करावी लागेल.
सर्व हप्ते एकत्र
लाडकी बहीण योजनेत केवायसीत चुक झाल्यानंतर लाखो महिलांचा लाभ बंद झाला आहे. पण आता केवायसीत दुरुस्ती केल्यानंतर ज्या महिला पात्र ठरतील त्यांना रखडलेला लाभ पुन्हा देण्यात येणार आहे. अशा महिलांना गेल्या तीन महिन्यांचा लाभ एकत्र दिला जाणार असून महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा होतील.
दरम्यान महिला व बालविकास विभागाकडील नोंदीनुसार १ कोटी ७६ लाख ५८७६ महिला लाडकी बहीण योजनेस पात्र ठरल्या आहेत. जानेवारी महिन्यात ही संख्या १ कोटी ६९ लाख इतकी होती. तर आज केवायसीत दुरूस्तीचा शेवटचा दिवस असून आज दुरूस्ती न केल्यास जवळपास ७१ लाख महिला या योजनेतून बाद होणार आहेत. यामुळे सरकारच्या निधीतही बचत होणार आहे.
1. KYC अपडेटची अंतिम तारीख कोणती आहे?
31 मार्च ही KYC दुरुस्तीची शेवटची तारीख आहे.
2. KYC अपडेट न केल्यास काय होईल?
₹1500 चा लाभ कायमचा बंद होऊ शकतो.
3. किती महिलांना याचा फटका बसू शकतो?
सुमारे 71 लाख महिलांना फटका बसू शकतो.
4. KYC का महत्त्वाचे आहे?
लाभ सुरू ठेवण्यासाठी आणि पात्रता कायम ठेवण्यासाठी KYC आवश्यक आहे.
5. योजना लाभार्थ्यांची संख्या किती आहे?
सध्या सुमारे 1 कोटी 76 लाख लाभार्थी आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.